खडवली : कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात होणार्या सहा तासाच्या भारनियमनाला कंटाळलेल्या जनतेने आता आपला मोर्चा टोरॉन्ट या खाजगी वीज कंपनीकडे वळवला असून महावितरणच्या वीजपुरवठयाऐवजी आम्हाला टोरेण्टची वीज द्या, अशी मागणी लावून धरली आहे ़ महावितरण ने कल्याणच्या ग्रामीण भागात सकाळ संध्याकाळ असे सहा तासाचे भारनियमन सुरू केले आहे. वीटभट्टया, स्टोन क्रशर आणि मोठे मोठे उद्योगधंदे असलेल्या याच भागातील सामान्य नागरिक वेळेवर वीज बिलाचा भरणा करीत असून बडे थकबाकीदार महावितरणच्या बिलाचा भरणा करीत नाहीत़ त्यामुळे याच उपविभागात वीज थकबाकीचा आकडा सारखा फुगत असून या समस्येने वळेवर वीज बिलाचा भरणा करणार्या सामान्य ग्राहकांनासुद्धा अंधारात राहावे लागत आहे़ वेळेवर वीज बिल न देणे, रिंडींग नुसार बिल न देणे, चुकीचे अवाढव्य रकमेचे बिल देऊन ग्राहकास हैराण करणे असे प्रकार याच विभागात होत असल्याने येथील ग्राहक कंटाळले आहेत़ खडवली, दानबाव, नडगाव, चिंचवली, उतने, हाल, उशिद, मढ, वावेघर, फळेगाव, कुंभारपाडा, राया, ओझर्ली, निंबवली, वासुंद्री, कोंडेरी, सांगोडे, ठाकूरपाडा, ज्युबिनीवाडी तसेच बर्याच आदीवासी पाडयांवर महावितरणच्या याच भारनियमनाने रात्री सव्वाआठ वाजेपर्यत अंधार राहत असून ऐन स्वयंपाकाच्या वेळी वीज नसल्याने महिलांना येथे खूपच त्रास सहन करावा लागत आहे ़दिवसभर काम करून घरी परतल्या नंतर वीज नाही अशी समस्या कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागत आज आहे. त्यामुळे महावितरणऐवजी आम्हाला भिवंडी तालुक्यातील टोरेन्टची वीज द्या, अशी एकच मागणी येथे जोर धरत आहे़ पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे ़ या दिवसात घरांमध्ये साप,विंचू असे प्राणी निघतात जर अशावेळी वीज नसली तर काय परिस्थिती होईल हे या अधिकारीवर्गाने लक्षात घ्यावे, असा सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. एकूण ५ हजाराच्यावर ग्राहक संख्या असलेल्या कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेची मोठी मागणी आहे़
खडवलीत टोरेन्टची वीज द्या
By admin | Published: May 26, 2014 4:17 AM