जव्हारसाठी खडखड धरणाचे पाणी द्या!

By Admin | Published: June 12, 2015 10:59 PM2015-06-12T22:59:03+5:302015-06-12T22:59:03+5:30

जव्हार शहराला वाढत्या नागरिकरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. १९६२ साली बांधलेला शहराला पाणीपुरवठा

Give water for rocks! | जव्हारसाठी खडखड धरणाचे पाणी द्या!

जव्हारसाठी खडखड धरणाचे पाणी द्या!

googlenewsNext

जव्हार : जव्हार शहराला वाढत्या नागरिकरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. १९६२ साली बांधलेला शहराला पाणीपुरवठा करणारा जयसागर डॅम शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला फेब्रुवारी, मार्च महिन्यातच पाणी कपात करून नियोजन करावे लागते. दिवसेंदिवस पाणीटंचाईचे दिवस वाढवावे लागल्याने नागरिक विशेषत: महिला वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे जव्हार शहरापासून जवळच असलेल्या खडखड धरणातील पाणी जव्हारकरांना मिळाले तर शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर होऊ शकते. यासाठी खडखड धरण ते जव्हार पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालघर जिल्हा परिष्ज्ञदेचे सदस्य अशोक भोये यांनी स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याकडे निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे. खडखड धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच तत्कालीन सत्ताधारी नगराध्यक्ष व उपनगराध्य यांनी जव्हारसाठीच्या पाणीपुरवठा योजनेची मागणी लावून धरली व त्यासंबंधीचा प्रस्ताव जलसंपदा विभाग व नगरविकास विभागाकडे सादर केला होता. परंतु पाठपुराव्याअभावी गेली अनेक वर्षे तो प्रस्ताव नगरविकास विभागाकडे धूळखात पडून आहे. परतु मध्यंतरीच्या काळात सत्ताबदल झाल्यामुळे जव्हारच्या दृष्टीने अतिशय महत्वाची व नागरिकांच्या मूलभूत समस्येशी निगडीत महत्वाकांक्षी योजना लालफितीत अडकली आहे.
जव्हार हे उपजिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे अनेक महत्वाची कार्यालये जव्हार येथे आहेत. प्रशासकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या शहराची प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळे नाशिक, ठाणे, फार्महाऊस आहेत. पाणी टंचाईच्या झळा नागरिकांबरोबरच पर्यटकांना देखील जाणवतात. विकतचे पाणी घेतल्यामुळे त्यांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. जि.प. सदस्य अशोक भोये यांनी मांडलेल्या मागणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आता आदिवासी विकास मंत्री ही योजना कधी सुरू करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Give water for rocks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.