ऑनलाईन शिक्षणासाठी मुलाकडे मोबाईल देणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:21+5:302021-05-28T04:06:21+5:30
मुलाच्या ऑनलाईन खरेदीमुळे पालकाला १ लाखाचा फटका मुलाच्या ऑनलाईन खरेदीमुळे पालकाला १ लाखाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
मुलाच्या ऑनलाईन खरेदीमुळे पालकाला १ लाखाचा फटका
मुलाच्या ऑनलाईन खरेदीमुळे पालकाला १ लाखाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाईन शिक्षणासाठी मुलाकडे मोबाईल देणे पालकाला भलतेच महागात पडले आहेत. यात, आईच्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल पे वरून ऑनलाईन जॅकेट खरेदी केले. मात्र याच जॅकेटसाठी त्यांच्या खात्यातून १ लाख ६ हजार रुपये गमवावे लागले आहेत. याप्रकरणी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवडी परिसरात ४२ वर्षीय तक्रारदार पती, १४ वर्षाचा मुलगा आणि १७ वर्षाच्या मुलीसोबत राहण्यास आहेत. त्यांचे पती टीव्ही रिपेअरिंगचे काम
करतात. सध्या शाळा बंद असल्यामुळे मुलाचे ऑनलाइन वर्ग सुरु असतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल मुलाकडे असतो. याच मोबाईलमध्ये गुगल पे ॲप आहे. अशात त्यांच्या मुलाने माँटरेशा कलेक्शन या ऑनलाईन शाॅपिंगचे वेबसाइटवरून जॅकेट मागवले.
त्याने गुगल पे वरून २६१ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. दोन दिवसाने दिलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकावर संपर्क साधून पार्सलबाबत चौकशी केली.
तेव्हा संबंधिताने, दिल्लीवरुन माँटरेशा कलेक्शनचा मार्केटिंग मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. लाॅकडाऊनमुळे ऑर्डर रद्द झाल्याचे सांगितले. पुढे, ऑर्डर करायची असल्यास मोबाईलवर आलेला कोड सांगण्यास सांगितला. तो कोड शेअर करताच, खात्यातून १० हजार रुपये गेल्याचा संदेश धडकला. मुलाने तत्काळ बँकेत धाव घेत पासबुकवर एंट्री घेतली. त्यात, खात्यातून १ लाख ६ हजार गेल्याचे समजले. त्यांनी तत्काळ घडलेला प्रकार आईला सांगताच त्यांना धक्का बसला. अखेर,
त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे.