Join us

36 तासांत अवयवदानाने मिळाले 8 जणांना जीवनदान!

By admin | Published: July 20, 2014 2:19 AM

अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांना ब्रेनडेड घोषित केल्यावर त्यांच्या नातेवाइकांच्या इच्छेने, संमतीने अवयवदान झाले पाहिजे.

मुंबई : अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांना ब्रेनडेड घोषित केल्यावर त्यांच्या नातेवाइकांच्या इच्छेने, संमतीने अवयवदान झाले पाहिजे. यामुळे अवयवदानाचा टक्का वाढेल, हा विचार आता रुजताना दिसतो आहे. गेल्या 36 तासांमध्ये (गुरुवार रात्र ते शनिवार संध्याकाळर्पयत) मुंबई आणि ठाणो परिसरात मिळून 3 ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले असून, यामुळे एकूण 8 जणांना जीवनदान मिळाले आहे. अवघ्या काही तासांत तीन कॅडेव्हर डोनेशन होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दादर येथील हिंदुजा रुग्णालयामध्ये गुरुवारी रात्री 58 वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या संमतीने तिच्या 2 किडनी आणि यकृत दान करण्यात आले. या महिलेचा रक्तगट ड+ होता. गुरुवारी रात्री तिच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर ज्यांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज होती अशा संबंधित रुग्णांना बोलावण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी 2 किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली. याच दरम्यान ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील 64 वर्षीय पुरुषाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. 
ज्युपिटर रुग्णालयातून शुक्रवारी दुपारी ब्रेनडेड रुग्णाविषयी माहिती मिळताच विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (ङोडटीसीसी) स्वयंसेवक रुग्णालयात पोहोचले. पुढच्या सहा तासांमध्ये दोनदा तपासण्या करण्यात आल्यावर 64 वर्षीय पुरुष ब्रेनडेड असल्याची निश्चिती करण्यात आली. या रुग्णाच्या नातेवाइकांच्या संमतीने त्याच्या दोन किडनी आणि यकृत दान करण्यात आले. यांचा रक्तगट ड+  होता. यांची किडनी मॅच होणा:या रुग्णांना बोलावण्यात आले आणि शनिवारी दुपार्पयत ही प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी रात्री लीलावती रुग्णालयातील 41 वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या महिलेचा रक्तगट इ+  होता. या महिलेच्या कुटुंबीयांनी फक्त 2 किडनी दान करण्यासाठी संमती दिली. यकृत अथवा इतर अवयव दान करण्यासाठी त्यांची संमती नव्हती. या महिलेच्या दोन्ही किडन्या काढण्यात आल्या. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शनिवारी रात्री पूर्ण झाली. (प्रतिनिधी)