Join us

नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान देणं हा 'सिग्नल', पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 6:30 PM

केंद्रात गडकरींकडे असलेलं खातं काढून ते खातं नारायण राणेंना दिलं आहे. त्यामुळे, हा मोठा सिग्नल देण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेसोबत तडजोड करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, पण ते शक्य होईना. म्हणून, हा मार्ग निवडला असावा, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देकेंद्रात गडकरींकडे असलेलं खातं काढून ते खातं नारायण राणेंना दिलं आहे. त्यामुळे, हा मोठा सिग्नल देण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेसोबत तडजोड करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, पण ते शक्य होईना. म्हणून, हा मार्ग निवडला असावा, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे

मुंबई - भाजपाने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील 4 नेत्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये, अग्रक्रमाने नारायण राणेंना मंत्रीपद देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग खात्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपाने राणेंचा डाव टाकल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. यासंदर्भात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्टपणे मत मांडलं आहे.  

केंद्रात गडकरींकडे असलेलं खातं काढून ते खातं नारायण राणेंना दिलं आहे. त्यामुळे, हा मोठा सिग्नल देण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेसोबत तडजोड करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, पण ते शक्य होईना. म्हणून, हा मार्ग निवडला असावा, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेल्या भाषेबद्दलही त्यांनी भाष्य केलंय. नारायण राणेंना कोण सांगणार, पण भाषा वापरताना एक संयम पाहिजे. आपली एक राजकीय संस्कृती आहे, त्याचं उल्लंघन करु नये. आपली काही तक्रार असेल तर मुख्यमंत्र्यांकडे केली पाहिजे, मुख्य सचिवांकडे केली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आमच्या मंत्रिमंडळात असताना ते उद्योग खाते सांभाळत होते, अनेक कमिट्या त्यांच्याकडे होत्या, ते तेव्हा आमचेही सहकारी होते. माझ्यासोबत ते चांगलेच वागत होते, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

पूरग्रस्तांच्या पाहणीला येता की अधिकाऱ्यांना बघायला

"काही नेते मंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले, पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत?, तहसीलदार कुठे आहेत? याची विचारणा करत बसलो नाही. पण काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. 

काय म्हणाले होते नारायण राणे

चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं होतं. "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं. 

टॅग्स :नारायण राणे पृथ्वीराज चव्हाणअजित पवारमुख्यमंत्रीमंत्री