काचेच्या इमारती असुरक्षितच
By admin | Published: April 14, 2015 12:39 AM2015-04-14T00:39:29+5:302015-04-14T00:39:29+5:30
मुंबईत झपाट्याने उभ्या राहिलेल्या काचेच्या इमारती असुरक्षित असल्याने मुंबई अग्निशमन दलाने नवीन धोरण आणले़
शेफाली परब-पंडित ल्ल मुंबई
मुंबईत झपाट्याने उभ्या राहिलेल्या काचेच्या इमारती असुरक्षित असल्याने मुंबई अग्निशमन दलाने नवीन धोरण आणले़ त्यानुसार २०१२ पूर्वीच्या इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मुदत दिली जाणार आहे़ मात्र अशा इमारतींचे रेकॉर्डच पालिकेकडे नसल्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे़ त्यामुळे अशा इमारतींच्या मालकांनाच पुढे येण्याचे आवाहन करण्याची वेळ पालिकेवर आली आहे़
आकर्षक दिसणाऱ्या चकचकीत काचा इमारतींना लावण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे़ विशेषत: व्यावसायिक इमारतींचा कल अलीकडे अशा ग्लास फसाड (खिडक्यांऐवजी काचा) लावण्याकडे आहे़ परंतु अशा इमारतींमध्ये आगीच्या घटना घडल्यास मदतकार्य धोकादायक ठरत आहे़ अंधेरी येथील लोट्स पार्क इमारतीमध्ये २०१२ मध्ये लागलेल्या भीषण आगीत एका जवानाचा बळी गेल्यानंतर हा धोका प्रकर्षाने जाणवला़ त्यानुसार वेगाने चक्र फिरली आणि काचेच्या इमारतींसाठी कठोर नियमावली तयार झाली़
२०१३ नंतरच्या काचेच्या इमारतींसाठी यापूर्वीच धोरण तयार करण्यात आले़ २०१२ पूर्वी उभ्या राहिलेल्या अशा इमारतींमध्येही बदल आवश्यक असल्याने जानेवारी महिन्यात पालिकेने नियमावली तयार केली़ आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून हिरवा कंदिल मिळताच इमारत प्रस्ताव विभाग या सर्व इमारतींना नोटीस पाठवून १२० दिवसांची मुदत देणार आहे़ मात्र या इमारतींची नोंदच नसल्यामुळे लोकांकडूनच माहिती मागविण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलातील सुत्रांनी सांगितले़
अग्निशमन सुरक्षा सप्ताह
१४ एप्रिल १९४४ मध्ये गोदीत भीषण स्फोट होऊ लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले होते़ या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी १४ ते २० एप्रिल अग्नि सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो़ या निमित्त उद्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून अग्निशमन दलाची रॅली निघणार आहे़ लोकांमध्ये जागृरुकता आणण्याचे या रॅलीचे उद्देश असून याची समाप्ती माटुंगा फाईव्ह गार्डन येथे होणार आहे़
च्अंधेरी येथील भीषण आगीच्या घटनेनंतर २०१२ पूर्वीच्या काचेच्या इमारतींना तत्काळ पत्र पाठविण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला़ त्यानुसार ग्लास फसाड इमारतींना १२० दिवसांची मुदत देऊन इमारत आग प्रतिबंधक करुन घेण्यात येणार होती़ मात्र अशा मुंबईत एकूण किती इमारती आहेत, याचा अचूक आकडा पालिकेला गेल्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतरही मिळाला नाही़
च्इमारत प्रस्ताव विभागाकडे मुंबईत सर्व इमारतींची नोंद असते़ मात्र ग्लास फसाड इमारतींसाठी आता नियमावली अस्तित्वात आल्याने २०१२ पूर्वीच्या काचेच्या इमारतींची नोंद पालिकेकडे नाही़ त्यामुळे आता वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन अशा इमारतींच्या मालकांना अग्निशमन दलासमोर येऊन नवीन नियमावलीची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे़
अशा काही आगीच्या दुर्घटना़़़
च्अंधेरी पश्चिम येथील लोटस पार्क इमारतालाही अशाच सुशोभित काचा लावण्यात आल्या होत्या़ त्यामुळे या इमारतीमध्ये आग लागल्यानंतर उष्णतेमुळे या काचा फुटून बाहेर अथवा जिन्यावर त्याचे तुकडे पडू लागले़ त्यामुळे आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला़
च्काचेमुळे धूर बाहेर पडू शकत नसल्याने त्यामध्ये अडकलेल्या पीडितांना शोधणेही कठीण होते़ तसेच धूर आतच धुमसत राहिल्याने गुदमरुनही अनेकांचा प्राण जावू शकतात़
च्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलातील व्यावसायिक इमारतीला आग लागल्यानंतर तेथील काचा फुटून मोठा धोका निर्माण झाला होता़
...अन्यथा
कारवाई अटळ
दिलेल्या मुदतीमध्ये आवश्यक बदल इमारतींमध्ये न केल्यास कठोर कारवाईची ताकीद पालिकेने दिली आहे़ पालिकेचे इमारत प्रस्ताव विभाग अशा इमारतींची पाहणी करुन आग प्रतिबंधक उपाययोजना व नियमानुसार आवश्यक बदल केले असल्याची खातरजमा करुन घेणार असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़