काचेच्या छताची बोगी मध्य रेल्वेच्या ताफ्यात! अत्याधुनिक सुविधांनी युक्त, निसर्गसौंदर्य पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:45 AM2017-09-04T04:45:11+5:302017-09-04T04:45:26+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील निसर्गसौंदर्याने बहरलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.

The glass roof of the central rail bridge! With state-of-the-art facilities, natural beauty can be seen | काचेच्या छताची बोगी मध्य रेल्वेच्या ताफ्यात! अत्याधुनिक सुविधांनी युक्त, निसर्गसौंदर्य पाहता येणार

काचेच्या छताची बोगी मध्य रेल्वेच्या ताफ्यात! अत्याधुनिक सुविधांनी युक्त, निसर्गसौंदर्य पाहता येणार

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील निसर्गसौंदर्याने बहरलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘विस्टाडोम’ (काचेचे छत असणारी) बोगी रविवारी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
संपूर्ण वातानुकूलित असणा-या या बोगीमध्ये पारदर्शी काचेच्या विस्तृत खिडक्या आहेत. तामिळनाडूमधल्या चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) विस्टाडोम बोगी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गसौंदर्य, दरी, घाट यांचे निरीक्षण करण्यासाठी ‘आॅब्जर्वेशन लाउंज’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या लाउंजमधून पर्यटकांना विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर छतावरही बहुतांशी भागात काच असल्यामुळे निसर्गप्रेमींना विस्टाडोमचा प्रवास म्हणजे सृष्टी-सौंदर्य न्याहाळण्यासाठी ‘पर्वणी’ ठरणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी या कोचमध्ये साहित्य ठेवण्यासाठी विशेष रॅकची व्यवस्था आहे.
विस्टाडोम बोगीत ४० इतकी आसनव्यवस्था पूशबॅक आणि रोटेड (१८० अंश कोनात फिरणारे) स्वरूपातील आहे. या आसनव्यवस्थेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना या कोचचे विशेष आकर्षण आहे. या बोगीचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय या बोगीत जीपीएस यंत्रणा, १२ एलसीडी लाइट, एक लहान आकाराचा फ्रीज, ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर अशादेखील सुविधा असणार आहेत. आधुनिक बनावटीचे स्वच्छ स्वच्छतागृह हेदेखील विस्टाडोमचे वैशिष्ट्य आहे. विशाखापट्टणम ते आरकू या हिल स्टेशनवर अशा प्रकारच्या बोगी धावत आहेत.

Web Title: The glass roof of the central rail bridge! With state-of-the-art facilities, natural beauty can be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.