घाटकोपर जेट्सचा शानदार विजय

By admin | Published: May 9, 2017 01:46 AM2017-05-09T01:46:07+5:302017-05-09T01:46:07+5:30

गतविजेत्या घाटकोपर जेट्सने बांद्रा हिरोजकडून मिळालेल्या पराभवानंतर जबरदस्त पुनरागमन करताना मुंबई लीग टी२० क्रिकेट

Glittering victory of Ghatkopar Jets | घाटकोपर जेट्सचा शानदार विजय

घाटकोपर जेट्सचा शानदार विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गतविजेत्या घाटकोपर जेट्सने बांद्रा हिरोजकडून मिळालेल्या पराभवानंतर जबरदस्त पुनरागमन करताना मुंबई लीग टी२० क्रिकेट स्पर्धेत ठाणे मराठाज संघाला ४१ धावांनी लोळवले. ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात घाटकोपरने १८१ धावा उभारल्यानंतर ठाणेकरांचा डाव १४३ धावांमध्ये गुंडाळला.
अख्तर शेख (३/२४), यश डोचोलकर (२/३१) आणि सिध्दार्थ नौमया (२/३०) यांनी केलेल्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर घाटकोपर संघाने धावांचा पाठलाग करत असलेल्या ठाणे संघाला गुंडाळले. ठाण्याकडून विजय रेड्डी (३३) आणि मेहबूब शेख (२७) यांनी चांगली झुंज दिली. परंतु, इतर सहकारी फलंदाजांकडून योग्य साथ न लाभल्याने ठाणेकरांना पराभूत व्हावे लागले.
तत्पूृर्वी, प्रथम फलंदाजी करताना घाटकोपरने जबरदस्त फटकेबाजी केली. करण नंदी याने ५ चौकार व ३ षटकार ठोकताना शानदार ९५ धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक मजल मारुन दिली. तसेच, प्रथमेश पवारनेही आक्रमक फलंदाजी करुन ६१ धावांची अर्धशतकी खेळी करुन ठाणेकर गोलंदाजांना चोपले. घाटकोपरच्या विजयात चमकलेल्या करण आणि प्रथमेश यांना मुंबई क्रिकेटमधील नामवंत प्रशिक्षक राजू पाठक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Glittering victory of Ghatkopar Jets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.