जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९ च्या तुलनेत ८२ % प्रवासी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:35 PM2020-06-17T19:35:39+5:302020-06-17T19:36:14+5:30

पुढील सहा महिने प्रवास टाळण्याचा ३६ % प्रवासांचा मनोदय 

Global air transport sector down 82% in June 2019 | जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९ च्या तुलनेत ८२ % प्रवासी घट

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९ च्या तुलनेत ८२ % प्रवासी घट

googlenewsNext


मुंबई : जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून 2019 च्या तुलनेत 82 % प्रवासी घट झाली असून पुढील सहा महिने प्रवास टाळण्याचा 36% प्रवासांचा मनोदय असल्याचे सर्व्हेक्षणात समोर आले आहे.  द इंटरनँशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)  ने अहवालात हे स्पष्ट केले आहे. हवाई वाहतूक क्षेत्राला सरकारी मदत मिळणे गरजेचे असून अन्यथा हे क्षेत्र कोलमडून पडण्याची भीती  व्यक्त करण्यात आली आहे. 


यंदा जगभरातील विविध हवाई वाहतूक कंपन्यांना 84.3 बिलीयन अमेरिकन डॉलर्सचा तोटा होण्याची शक्यता आयएटीएने वर्तवली आहे. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत विमान कंपन्यांसाठी जीवनवाहिनी ठरेल. अवघ्या 45 % जणांनी पुढच्या काही महिन्यात विमान प्रवास करण्याची इच्छा प्रदर्शित केली. तर 36 % जणांनी पुढील सहा महिन्यापर्यंत विमान प्रवास टाळण्याचा सूर आळवला. यापूर्वी एप्रिल महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात केवळ 21 % जणांनी पुढील सहा महिने विमान प्रवास टाळण्याचा निर्धार केला होता व 61 % जणांनी पुढील काही महिन्यात विमान प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  जून 2019 च्या तुलनेत जगभरातील विविध हवाई कंपन्याकडील आकडेवारीनुसार हवाई प्रवासाच्या आरक्षणात तब्बल 82 % घट झाली आहे. 

नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्याच्या तिकीट आरक्षणात देखील नेहमीच्या तुलनेत 59% घट झाली आहे. साधारणत: 14 % विमान तिकीटे प्रवासाच्या 22 आठवडे अगोदर विक्री होतात. मात्र सध्या 1-7 नोव्हेंबर या कालावधीसाठी केवळ 5% विमान तिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत.  मात्र यामधून बाहेर पडण्यासाठी विमान कंपन्यांनी तिकीट दर, विमानतळ प्रशासनाने महसूल वाढवण्यासाठी विमानतळावरील विविध शुल्क वाढवण्याच्या फंदात पडू नये असा सल्ला आयएटीए ने दिला आहे. 

Web Title: Global air transport sector down 82% in June 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.