जागतिक मधुमेह दिन विशेष : देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:23 AM2018-11-14T02:23:12+5:302018-11-14T02:23:36+5:30

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०३० पर्यंत मधुमेह हा मनुष्यहानी घडवणारा सातवा मोठा आजार ठरणार आहे, असा इशारा ...

Global Diabetes Day Special: The growing challenge of diabetes in front of the country | जागतिक मधुमेह दिन विशेष : देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान

जागतिक मधुमेह दिन विशेष : देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान

Next

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०३० पर्यंत मधुमेह हा मनुष्यहानी घडवणारा सातवा मोठा आजार ठरणार आहे, असा इशारा दिला आहे. जागितक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान असल्याचे दिसून येत आहे. दर दहा हजार लोकसंख्येमागे साधारणत: ३२५च्या आसपास मधुमेहाचे रुग्ण आढळतात. पूर्वी श्रीमंतांचा रोग म्हणून ख्याती असलेला मधुमेह आता सर्वसामन्यांपर्यंत पोहोचला असून यात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा समावेश सर्वाधिक आहे.

बदलत चाललेली खाद्य संस्कृती, भोजनात निकस, पोटभरू पदार्थांचा समावेश, मद्यपान, रात्रीची जागरणे, वाढत्या स्पर्धेमुळे व ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्या कारणांचा परिपाक म्हणून मधुमेह देशात झपाट्याने पसरत आहे. याविषयी डॉ. विक्रांत शहा यांनी सांगितले की, आहार, व्यायाम, विश्रांती यांची योग्य सांगड घालणारी जीवनशैली आचरणात आणली तर मधुमेह नक्कीच नियंत्रणात ठेवता येईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार, आपण कुटुंबापासून मधुमेह रुग्णांची मदत केली पाहिजे. बऱ्याचदा ही औषधोपचार प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू असल्याने रुग्ण दुर्लक्ष करतात. अशा वेळेस त्यांना आधार देणे आणि औषधांचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे असते.

गेल्या काही वर्षांत मधुमेहाचे रुग्ण अगदी लहान वयातही आढळतात, याविषयी माहिती देताना मधुमेहतज्ज्ञ डॉ. नलिनी गुजर यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये होणारा हा मधुमेहाचा प्रकार ‘टाइप क’ या नावाने संबोधला जातो. हा मधुमेह होण्याचे नेमके कारण अजून सापडलेले नाही. आपल्या शरीरात जठराच्या मागे स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते, त्यात इन्सुलीन तयार करण्यासाठी बीटा पेशी असतात. बाल-मधुमेहींमध्ये काही कारणाने रोगप्रतिबंधक यंत्रणा (आॅटोइम्युनिटी) या बीटा पेशींना परके ठरवते व एखाद्या जंतूवर हल्ला केल्याप्रमाणे बीटा पेशींवर हल्ला करते आणि अर्थातच यात बीटा पेशींचा नाश होतो. या प्रक्रियेला अनेक घटक जबाबदार असतात.

प्रकार : मधुमेहाचे दोन प्रकार असतात. त्यातल्या पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. दुसºया प्रकारात (टाइप-२) स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. परिणामत: रक्तातली साखर वाढत राहते. भारतात मधुमेहाचे रुग्ण बहुतांशी या दुसºया प्रकारचे आहेत.
लक्षणे : सातत्याने लघवी होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, बरेचदा थकल्यासारखे वाटणे, त्वचा एकदम कोरडी होणे, जखमा बºया होण्यास वेळ लागणे, नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत. याखेरीज मळमळल्यासारखे वाटणे, उलटीची भावना होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे जाणवू शकतात.
 

Web Title: Global Diabetes Day Special: The growing challenge of diabetes in front of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.