विद्यार्थ्यांनी उलगडले वैश्विक भाषेचे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:13 AM2020-01-05T05:13:42+5:302020-01-05T05:13:47+5:30

अगदी भाषेच्या उगमापासून ते आजच्या डिजिटल काळापर्यंत बदलणारा भाषांचा चेहरामोहरा विविध सादरीकरणाच्या माध्यमातून पार्ले टिळक विद्यालयाच्या भाषा विश्व प्रदर्शनातून उलगडण्यात आला.

Global language halls opened by students | विद्यार्थ्यांनी उलगडले वैश्विक भाषेचे दालन

विद्यार्थ्यांनी उलगडले वैश्विक भाषेचे दालन

Next

मुंबई : एक भलीमोठी गुहा आणि गुहेतून भिंतीच्या ओबडधोबड रेषा व चित्रांपासून, अगदी भाषेच्या उगमापासून ते आजच्या डिजिटल काळापर्यंत बदलणारा भाषांचा चेहरामोहरा विविध सादरीकरणाच्या माध्यमातून पार्ले टिळक विद्यालयाच्या भाषा विश्व प्रदर्शनातून उलगडण्यात आला. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पार्ले टिळक समूहाच्या भाषा विश्व प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. शालेय विद्यार्थ्यांना भारतीय भाषांबद्दल माहिती व्हावी यासाठी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या नऊ शाळांनी शनिवारी आणि रविवारी ‘भाषाविश्व’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय भाषांपासून ते वैश्विक भाषांपर्यंतचे दालनच विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाषांचे इतके सहज, सुंदर वर्णन आणि त्यांचा इतिहास, परंपरा यांची माहिती एकाच ठिकाणी अशा प्रकारे संकलित करणे म्हणजे दुर्मीळ योग असल्याची प्रतिक्रिया गाडगीळ यांनी देत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही कौतुक केले. सोबतच प्रदर्शनाच्या वेळी सादरीकरण कसे करावे? भाषाकौशल्य कसे असावे, सुधारण्यासाठी कुठे कसा वाव आहे, याबाबतही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंद पसरला. संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा समजून घेण्यासाठी, त्यातील विविध गमतीजमती मुलांना दाखविण्यासाठी मुलांनी सादरीकरणात विविध खेळांचा समावेश केला आहे. भाषा म्हटली की व्याकरणाचा कठीण भाग अनेकांना नकोसा वाटतो.
मात्र १ ते ६ वीच्या पार्ले टिळकच्या विद्यार्थ्यांनी तेही सहजसोप्या पद्धतीने, नाटकी सादरीकरणाच्या रूपाने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय भाषांसोबतच जागतिक भाषा, त्यांच्या संवादाचे माध्यम, अगदी ताम्रपटापासूनचा भाषेचा उगम, त्याचा इतिहास आणि भाषेचे खेळ, गमतीजमती अशा अनेक विषयांवरील स्टॉल्स आणि विद्यार्थ्यांचे सादरीकरण या प्रदर्शनात पाहायला मिळतात. यंदा पहिल्याच दिवशी हा आकडा साडेसात हजारांहून अधिक गेल्याची माहिती या प्रदर्शनाच्या आयोजिका आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना त्रैलोक्य यांनी दिली.
>प्रवास उलगडणारी
गुहा ठरतेय केंद्रबिंदू
सगळ्यात विशेष म्हणजे भाषा विश्वाचा प्रवास उलगडणारी गुहा सगळ्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरत आहे. या गुहेत आदिमानव काळापासून भाषेचा झालेला उगम, त्यानंतर कालानुरूप बदलत गेलेले भाषेचे स्वरूप, भाषा आणि समाज, भाषा आणि तंत्रज्ञान असा मजेशीर प्रवास ही गुहा घडवणार आहे. या गतवर्षी या प्रदर्शनाला तब्बल साडेआठ हजाराहून अधिक लोकांनी उपस्थिती नोंदवली होती.

Web Title: Global language halls opened by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.