लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:10 AM2021-05-11T07:10:07+5:302021-05-11T07:11:08+5:30

लस साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला वेळोवेळी नियम बदलावे लागत आहेत.

Global tender to be called for vaccines, BMC preparing for purchase of 50 lakh vaccines | लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी

लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी

Next

 
मुंबई: केंद्राकडून येणाऱ्या लसींचा साठा मर्यादित असल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. लस मिळत नसल्याने काहीवेळा लसीकरण बंद देखील करावे लागले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता जागतिक निविदा मागवून ५० लाख लस घेण्याची तयारी केली आहे. यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना सोमवारी दिली.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. तर आतापर्यंत २७ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सात लाख एवढे आहे. या मोहिमेच्या निर्णायक टप्प्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात झाली. मात्र मर्यादित लस साठा उपलब्ध होत असल्याने अवघ्या पाच केंद्रांवर प्रत्येकी ५०० नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने स्वत: जागतिक निविदा काढून ५० लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी केली लस खरेदीची घाई 
लस साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला वेळोवेळी नियम बदलावे लागत आहेत. त्यात जुलैमध्ये अपेक्षित कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी किमान ६० लाख नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पुढील ८० दिवसांत या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. त्यामुळेच लस खरेदी करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व पक्षीय गटनेत्यांना सोमवारी सांगितले.

दररोज दोन लाख लसींचे लक्ष्य
nज्या प्रमाणात लस मिळतील तेवढे लसीकरण करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र जागतिक निविदेमुळे लसींचा अधिक पर्याय उपलब्ध होणार आहे. 
nही लस तत्काळ उपलब्ध झाल्यास एक ते दीड लाखापर्यंत दररोज लसीकरण करणे शक्य होईल. 
nतर, कालांतराने ही क्षमता दोन लाखापर्यंत वाढवता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या चार लसींचा पर्याय
मुंबईत सध्या कोविशिल्ड ही सिरम कंपनीची आणि कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक कंपनीची लस वापरली जात आहे. तर, आता जॉन्सन ॲड जॉन्सन, फायझर, स्पुतनिक, मॉर्डना या चार लसींचा महापालिका विचार करीत आहे.
 

Web Title: Global tender to be called for vaccines, BMC preparing for purchase of 50 lakh vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.