गो एअर, इंडिगोची देशांतर्गत वाहतूक टी १, तर आंतरराष्ट्रीय वाहतूक टी २ वरून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:49 AM2019-08-24T02:49:58+5:302019-08-24T02:50:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून होणाऱ्या या विमान वाहतुकीत हा बदल होणार आहे.
मुंबई : १ आॅक्टोबरपासून इंडिगो व गो एअरची सर्व देशांतर्गत विमानांची वाहतूक टर्मिनल १ वरून व आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक टर्मिनल २ वरून होईल, तर स्पाइसजेटची सर्व विमान वाहतूक टर्मिनल २ वरून होईल. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून होणाऱ्या या विमान वाहतुकीत हा बदल होणार आहे. या विमानतळावरून २०१८-१९ मध्ये ४८ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता. देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मधून देशांतर्गत विमानांची वाहतूक करणे व टर्मिनल २ द्वारे देशांतर्गत विमानांसोबत आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक केली जाते. सध्या ५० आंतरराष्ट्रीय व ९ देशांतर्गत विमान वाहतूक कंपन्यांच्या माध्यमातून सेवा पुरविली जात आहे. मुख्य धावपट्टीवरून प्रति तास ४६ विमानांची वाहतूक केली जाते, तर दुय्यम धावपट्टीवरून प्रति तास ३५ विमानांची वाहतूक केली जाते. पेपरलेस बोर्डिंग पासपासून अॅपद्वारे बाहेरील खाद्यपदार्थ मागविणे, बॉडी स्कॅनर लावणे असे विविध प्रयोग विमानतळामध्ये करण्यात आले आहेत.