गो ग्रीन : लाखो वीज ग्राहक पर्यावरणस्नेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:00 AM2020-03-25T00:00:15+5:302020-03-25T15:32:16+5:30
वीज ग्राहक अधिकाधिक पर्यावरणपूरक होत आहेत.
गो-ग्रीन : लाखो वीज ग्राहक पर्यावरणस्नेही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून, यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४० हजार ग्राहकांचा समावेश आहे.
गो-ग्रीन योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेलचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वर्षाला १२० रुपयांची बचत होईल. शिवाय वीजबिल ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह आॅनलाईनद्वारे भरण्याची सोय आहे. ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे. दरम्यान, गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर उपलब्ध आहे.
...................................
आतापर्यंत १ लाख ३ हजार ९१८ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग नोंदविला आहे.
पुणे : ४० हजार ६९
कोकण : ३७ हजार ८००
नागपूर : १३ हजार ७१७
औरंगाबाद : १२ हजार ३३२
...................................