मुंबई : कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच भाग म्हणून सोमवारपासून खासगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरू होत असून, सरकारी आदेशानुसार इतर कर्मचाऱ्यांना घरी राहूनच काम करावे लागेल. शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त खुली केली जाणार नाहीत. तसेच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचे निर्बंध कायम असतील.
मुंबईत बेस्टच्या फेऱ्यांत वाढ केली जाईल. काही प्रमाणात ओला-उबेरसारख्या खासगी टॅक्सीसेवा सुरू होतील, पण टीएमटी, एनएमएमटी, केडीएमटी, एमबीएमटी यासारख्या परिवहन सेवांच्या फेºयांतही अत्यावश्यक सेवेपलिकडे मोजक्या प्रमाणात वाढ केली जाईल. त्यानंतर त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि कोरोनाचे संक्रमण पाहून फेºया वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत असल्याने अडीच महिन्यांहून अधिक काळ ठप्प झालेली मुंबई आणि महानगर प्रदेश हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सोमवारपासून कार्यालयात येणाºया कर्मचाºयांना सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर, मास्क यांचे नियम पाळावे लागणार आहेत. घरी परतल्यानंतर (पान ६वर)नोकरदारांसाठीआजपासून बेस्ट सुरूराज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंरोजगार असणारे यांना ओळखपत्र दाखवून सोमवारपासून बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे. - वृत्त/२राज्यातील बंदी कायमआता नियोजित टप्प्यानुसार राज्यातील जनजीवन व अर्थव्यवस्थेचा गाडा सुरू केला जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील मंदिरे, प्रार्थनास्थळे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट्स उघडण्याची परवानगी दिली असली, तरी याबाबत महाराष्ट्र सरकारने रात्री उशिरापर्यंत कोणतेच आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे तूर्तास या बाबी राज्यात बंदच असतील.हे सुरू होणार10%मनुष्यबळासह खासगी कार्यालये. कार्यालयात येणाºया कर्मचाºयांसाठी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे नियम पाळणे आवश्यक.स्टेडियम व खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र प्रेक्षकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील.सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीत दुचाकीवर एक प्रवासी, तीन चाकी किंवा रिक्षंत चालक अधिक दोन प्रवासी, चार चाकी वाहनांत चालक अधिक दोन प्रवासी.जिल्ह्यांतर्गतबस वाहतुकीला जास्तीत जास्त50%प्रवासी क्षमतेसह परवानगी. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.यावरील बंदी कायमशाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणी वर्ग बंद.लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी नसलेल्या रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह आणि तत्सम इतर ठिकाणेआंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)आंतरराष्ट्रीय सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी