परदेशात शिकायला जा, शिष्यवृत्तीही मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:38 PM2023-08-13T13:38:45+5:302023-08-13T13:39:29+5:30
विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या अर्जाची प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट साक्षांकित प्रतींसह संबंधित विद्यार्थ्याला उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत अगोदर १२ जुलै आणि त्यानंतर १३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत आता वाढविली असून, विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार.