Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:51 PM2022-02-04T18:51:05+5:302022-02-04T18:52:03+5:30

Goa Election 2022: शिवसेनेनंतर आता शरद पवार उत्पल पर्रिकर यांच्याविषयी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

goa election 2022 nawab malik statement over can ncp to support utpal parrikar in panjim | Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले!

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले!

Next

मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता प्रचार करण्यावर सर्व राजकीय पक्षांचा भर वाढत चालला आहे. यातच उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने शब्द पाळत पणजीतील आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पणजीत उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याविषयी काही संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.

मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी गोवा भाजपवर जोरदार निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात भाजपला उभारी दिली. ज्या व्यक्तीवर भाजपवाले वारंवार आरोप करत राहिले, त्यांनाच पक्षात घेऊन आता उमेदवारीही दिली. इतकेच नव्हे, तर त्यांना हव्या असलेल्या आणखी अन्य ठिकाणच्या जागाही दिल्या. मूळ भाजपवाल्यांना तिकिटे नाकारली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. 

भाजपच्या भूमिकेमुळे पणजीकरांचा उत्पल यांना पाठिंबा

भाजपच्या याच दुटप्पी भूमिकेमुळे मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पणजीवासीयांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक जणांचे समर्थन मिळत आहे, असे सांगत राष्ट्रवादी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देणार का, याविषयी आताच काही सांगू शकत नाही. मात्र, उत्पल यांना पाठिंबा द्यायचा का, याविषयी आमचे गोव्यातील स्थानिक नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष निर्णय घेतील, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांची उत्पल पर्रिकर यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. तो मागे घेत त्यांनी याआधीच उत्पल यांना पाठिंबा दिलेला आहे. उत्पल पर्रिकर यांनी काँग्रेस व आप वगळता भाजपविरोधी प्रत्येक घटकाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. उत्पल यांना मिळत असलेले वाढते समर्थन लक्षात घेता भाजपचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 

Web Title: goa election 2022 nawab malik statement over can ncp to support utpal parrikar in panjim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.