Join us

पी अ‍ॅण्ड डब्ल्यू इंजिन वापरण्यास गोएअर आणि इंडिगो एअरलाईन्सला मनाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:51 AM

गोएअर व इंडिगो एअरलाईन्सला त्यांची ए-३२० निओ एअरक्राफ्ट न चालविण्याचे आदेश देण्याचे निर्देश नागरीविमान उड्डाण महासंचलनालयाला (डीजीसीए) द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मुंबई : गोएअर व इंडिगो एअरलाईन्सला त्यांची ए-३२० निओ एअरक्राफ्ट न चालविण्याचे आदेश देण्याचे निर्देश नागरीविमान उड्डाण महासंचलनालयाला (डीजीसीए) द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. शुक्रवारी या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने डीजीसीएला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. ए-३२० एअरक्राफ्टसाठी वापरण्यात येत असलेले पी अँड डब्ल्यू इंजिन योग्य नसल्याचे खुद्द डीजीसीएने मान्य केले आहे. त्यामुळे गोएअर व इंडिगोला हे इंजिन न वापरण्याचा आदेश द्यावेत, अशी विनंती हरीश अग्रवाल यांनी केली आहे. न्यायालयाने डीजीसीए व दोन्ही विमान कंपन्यांना नोटीस बजावली आहे.