Join us

तरुणांना काम, वृद्धांना आराम हेच अर्थव्यवस्थेचे लक्ष्य!

By admin | Published: March 01, 2015 2:55 AM

आधुनिक कौशल्यांचे शिक्षण... ज्या कुणाकडे पुढे जाण्याची हिंमत, नवे काही शिकण्याचे हुनर असेल, त्याला शिष्यवृत्ती अगर कर्जाच्या रूपाने आर्थिक पाठबळ...

यंग इंडिया : कौशल्य विकासासाठी अनेक योजनांची घोषणा; बौद्धिक क्षमता वाढविण्यावर भरअपर्णा वेलणकर - मुंबईजो खेड्यापाड्यात जन्मला-शिकला त्याला किमान रोजगार-योग्य बनवण्यासाठीच्या अत्यावश्यक आधुनिक कौशल्यांचे शिक्षण... ज्या कुणाकडे पुढे जाण्याची हिंमत, नवे काही शिकण्याचे हुनर असेल, त्याला शिष्यवृत्ती अगर कर्जाच्या रूपाने आर्थिक पाठबळ... नोकरी मागण्याच्या वयात ज्या कुणाकडे अन्यांना नोकरी देण्याची बौद्धिक क्षमता असेल, नवनिर्मितीसाठी ‘तयार’ करणारी गर्भगृहे(इंक्यूबेशन सेंटर्स)... ज्या कुणाला स्वत:चा स्वतंत्र उद्योग-व्यवसाय उभारायचा असेल त्याच्या/तिच्यासाठी पतपुरवठ्यापासून सुलभ/तत्काळ उद्योग परवान्यापर्यंतच्या सुविधा...केंद्रीय अर्थसंकल्पात विखुरलेल्या अशा अनेक तरतुदी एकत्रितरीत्या पाहिल्या, तर ‘सबका साथ, सबका विकास’चा घोष करणाऱ्या मोदी सरकारचे मुख्य लक्ष्य ‘तरुण भारत’ हेच असल्याचे प्रामुख्याने दिसते.साऱ्या जगाचे लक्ष असलेला ‘मेक इन इंडिया’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतात मुबलक उपलब्ध असलेले तरुण मनुष्यबळ कालानुरूप कौशल्यांनी प्रशिक्षित केल्याखेरीज साध्य करता येणार नाही, याबद्दलचे तज्ज्ञांनी वारंवार दिलेले इशारे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही महत्त्वाकांक्षी योजना आणि तरतुदींमध्ये प्रतिबिंबित झाले आहेत. देशातले प्रत्येक खेडे ‘कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी’ने जोडण्याचे उद्दिष्ट याच ‘तरुण भारता’ने देशापुढच्या प्राथमिकतांमध्ये खेचून आणले आहे. देशाच्या औद्योगिक विकासाच्या या नव्या इंजिनाला इंधनाचा पुरवठा कमी पडू नये, याची पुरेपूर काळजी जेटलींनी घेतल्याचे दिसते. कालचक्राच्या विशिष्ट टप्प्यावर देशातील सर्वाधिक लोकसंख्या तरुण असण्याचा हा लाभांश-कालावधी सध्या भारताच्या वाट्याला आला आहे. त्याचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने निदान पावले पडण्यास सुरुवात झाली आहे, इतपत दिलासा हा अर्थसंकल्प देतो हे नक्की!प्रधानमंत्री ‘मुद्रा’ योजना...... 20,000 कोटी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनांस एजंसी- ‘मुद्रा’च्या स्थापनेसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद. लघुपतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या अंतर्गत लघुउद्योजकांना निधीची उपलब्धताअटल इनोव्हेशन मिशन$$्निंजगभरातील शिक्षणतज्ज्ञांच्या सहभागाने देशात नवनिर्मितीला प्रोत्साहक असे वातावरण आणि संस्कृती (इनोव्हेशन कल्चर) निर्माण करण्यासाठी ‘नीति’ आयोगाच्या अंतर्गत विशेष योजनासेतू .......... 1000 कोटीसेल्फ एम्प्लॉयमेंट अ‍ॅण्ड टेलेंट युटिलायझेशन- सेतू : या योजनेंतर्गत नव्याने सुरू होणारे उद्योग (स्टार्ट-अप्स) आणि पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत/मार्गदर्शन करणारी केंद्रे (इंक्यूबेशन सेंटर्स) स्थापन होतील. आयआयएम आणि आयआयटीसारख्या शिखर संस्थांमध्ये ही केंद्रे विकसित केली जातील.इंक्यूबेशनऔद्योगिक नवनिर्माणाची सर्वाधिक शक्यता असलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तरुण उद्योजकांना नव्या कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण, पतपुरवठा आणि परवाने या सर्व स्तरावर मदत करणारी व्यवस्था‘स्किल इंडिया’च्राष्ट्रीय कौशल्य अभियान : भारतभरातील तरुणांना रोजगारक्षम बनवणारी कौशल्ये शिकवण्याच्या सर्व मंत्रालयांमधील नव्या-जुन्या योजनांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्तावच्दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना : ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्यविकास अभियानच्प्रधानमंत्री विद्या-लक्ष्मी कार्यक्रम : पात्र पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठीच्या शिष्यवृत्त्या.