आयपीएलची बनावट तिकिटे विकणारे गजाआड

By admin | Published: May 28, 2016 01:36 AM2016-05-28T01:36:41+5:302016-05-28T01:36:41+5:30

वानखेडे स्टेडियमबाहेर आयपीएल सामन्यांची बनावट तिकिटे विकणाऱ्या एका टोळीला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. नामदेव देडगे (२३), हितेश वेद (४३), इब्राहिम खान (५८), केतन धावरे

Goalpals selling fake stamps of IPL | आयपीएलची बनावट तिकिटे विकणारे गजाआड

आयपीएलची बनावट तिकिटे विकणारे गजाआड

Next

मुंबई : वानखेडे स्टेडियमबाहेर आयपीएल सामन्यांची बनावट तिकिटे विकणाऱ्या एका टोळीला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. नामदेव देडगे (२३), हितेश वेद (४३), इब्राहिम खान (५८), केतन धावरे (३७) आणि प्रवीण नाईक (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.
मागील महिन्यात २८ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी एक इसम येथे दाखल झाला होता. मात्र तिकिटे संपल्याने तो निराश होऊन घरी परतत असताना त्याला स्टेडियमबाहेर एक इसम भेटला. या इसमाने आपल्याकडे तिकिटे असल्याचे सांगत या प्रकरणातील तक्रारदाराला ५ तिकिटे दिली. त्यानुसार तिकिटे खरेदी केल्यावर तक्रारदार मित्रांसह क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी २८ एप्रिल रोजी वानखेडे मैदानावर गेले. या वेळी तिकीट दाखवत असताना त्यावर बारकोड नसल्याने हे तिकीट बनावट असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. मात्र काहीही पुरावा नसल्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकत नव्हते. याच काळात आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नामदेव देडगे या आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने बनावट तिकिटांबाबत माहिती दिली.

Web Title: Goalpals selling fake stamps of IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.