Join us

देवनारच्या पशुवधगृहात बकऱ्यांची खरेदी-विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 2:09 AM

विळखा होतोय सैल: कामगार, व्यापारी वर्गात आनंद

- ओमकार गावंड मुंबई : अखेर सहा महिन्यांनंतर देवनार येथील पशुवधगृह बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी खुला झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत बकºयांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाल्यामुळे मेंढपाळ, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मांस विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देवनार पशुवधगृहात भरणारा बकºया-मेंढ्यांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. यामुळे या पशुवधगृहातील व्यवसायावर अवलंबून असणाºया हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.देवनार येथील पशुवधगृह आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह आहे. महाराष्ट्रासहित विविध राज्यांमधून शेतकरी त्यांच्या बकºया येथे आणतात. आणि परवानाधारक व्यापारी त्या खरेदी करून त्यांचे मांस देश-विदेशात विकतात. येथे दररोज ६ हजार जनावरे कापली जातात त्यातून जवळपास १५ कोटी रुपयांचे मांस देश-विदेशात विकले जाते. यातून महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.बकरीचे पालन करणाºया शेतकºयापासून दलाल, व्यापारी, बकºयांची वाहतूक करणारे वाहतूकदार, मांसाची निर्यात करणारे कामगार, बकºयांचे विविध अवयव रिटेल दुकानात विकणारे कामगार अशा सर्वांचे या पशुवधगृहावर पोट अवलंबून आहे. देवनार पशुवधगृह आजपासून सुरू झाल्यामुळे सर्वांच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. पहिलाच आठवडा असल्यामुळे बकºयांची संख्या कमी आहे. परंतु काही दिवसातच येथील व्यवसाय पूर्ववत होईल. सर्व कामगार असंघटित कामगार असल्याने त्यांना विमाकवच देणे आवश्यक आहे. - रावसाहेब दारगुंडे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनासहा महिने पशुवधगृह बंद असल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून हे पशुवधगृह सुरू होण्यासाठी आम्ही व इतर अनेक संघटना प्रयत्नशील होतो. महानगरपालिकेने नियम व अटी घालून हे पशुवधगृह सुरू केल्याबद्दल येथे सर्वांना आनंद झाला आहे. त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेचे आभार मानतो.- तुकाराम पाटील, अध्यक्ष, धनगर कामगार वेल्फेअर संघ