Join us

ब्राझीलमध्ये ‘देव’ चमकला!

By admin | Published: December 07, 2014 1:00 AM

ब्राझील येथील जुईज दे फोरा येथे झालेल्या विश्व शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या सात वर्षाखालील गटात मुंबईच्या देव शाह याने धमाल केली.

मुंबई : ब्राझील येथील जुईज दे फोरा येथे झालेल्या विश्व शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या सात वर्षाखालील गटात मुंबईच्या देव शाह याने धमाल केली. या चिमुकल्याने ही स्पर्धा जिंकत ‘फिडे’च्या कँडिडेट मास्टरचाही किताब आपल्या नावे केला. ही स्पर्धा 4 डिसेंबरला झाली. 
सात वर्षीय देव हा साऊथ मुंबई चेस अकादमीचा प्रशिक्षणार्थी असून, तो धीरुभाई अंबानी शाळेचा विद्यार्थी आहे. त्याने स्पर्धेत 9 फे:यांतून 7.5 हे सर्वाधिक गुण मिळविले. मोंगालियाचा ऑचिरबट आणि उजबेकिस्तानचा सिंदारोव इस्लोमबेक यांच्यासोबत त्याचा ‘टाय’ झाला होता. अखेर सर्वाेत्कृष्ट सरासरीच्या बळावर त्याने विश्व शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावला. सध्या 1,448 एवढे त्याचे रेटिंग आहे. 
वडील राहुल आणि आई कृपाली शाह यांनी देवच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. विश्व शालेय बुद्धिबळ विजेत्या मुलाचे पालक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
देव शहा याच्या विजयाबद्दल बोलताना त्याचे प्रशिक्षक डी. व्ही. गणोश यांनी सांगितले की, त्याच्या कार्यक्षमतेवर आम्हाला विश्वास 
होता. तसेच आम्हाला या स्पर्धेचे विजेतेपद तो पटकावेल हे अपेक्षित होते. तरीसुद्धा त्याच्या विजयामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे महासचिव नागेश 
गुट्टाला यांनी देव याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मेहनत, जिद्द यांच्या जोरावरच तो चॅम्पियन बनला 
आहे. भविष्यातही त्याच्याकडून 
अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
 
च्भारताचा पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद हा देव याचा आदर्श आहे. तो म्हणतो, आनंद हेच माङो आवडते आहेत. त्यांची खेळण्याची शैली आणि टिप्समुळे मला ही चॅम्पियनशिप मिळविता आली. मुंबईत झालेल्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेवेळी देवने आनंदची भेट घेतली होती. या भेटीने तो उत्साहित झाला होता.