Join us

उमेदवारांचे साकडे देवबाप्पाला!

By admin | Published: September 30, 2014 11:25 PM

पितृपक्षाच्या सावटामुळे आधीच उशिराने सुरू झालेला विधानसभेच्या प्रचाराचा मोसम आता चांगलाच रंगणार आहे.

अमोल पाटील ल्ल खालापूर
पितृपक्षाच्या सावटामुळे आधीच उशिराने सुरू झालेला विधानसभेच्या प्रचाराचा मोसम आता चांगलाच रंगणार आहे. त्यानिमित्ताने देवाचे दर्शन घेऊन, त्याला गा:हाणो घालून उमेदवार प्रचाराच नारळ रायगडात फोडत आहेत. सेनेचे बबन पाटील यांनी वरद विनायकाला नमन करून प्रचाराचे रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लाड यांनी अष्टविनायक क्षेत्रतील महड गणपतीचे दर्शन घेऊन व अभिषेक करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. इतर उमेदवारही देवदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. 
यावेळी वरदविनायकाला अभिषेक घातल्यावर कर्जत - खालापूर शिवसैनिकांनी निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करून विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी खालापूर येथे 
केले. खालापूर तालुक्यातील महड गणपती मंदिरात अभिषेक घालून सेनेने प्रचाराचे रणशिंग फुंकले 
आहे.
यावेळी उमेदवार हनुमंत पिंगळे, गोविंद बैलमारे , शिरीष बुटाला, तालुका प्रमुख संतोष विचारे, उल्हास भुर्के, सुरेश कडव, एच. आर. पाटील, युवा सेनेचे सुशांत शेलार , देवेंद्र देशमुख, जनार्दन थोरवे, आत्माराम पाटील, आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सेनेचे तिकीट न मिळाल्याने शेकापमध्ये प्रवेश करून उमेदवारी लढवत असणारे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा बबन पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला . थोरवे तिकीट वाटप प्रक्रि येवर जी टीका करीत आहेत, ती पूर्णपणो चुकीची असल्याचे सांगून पक्षप्रमुखांनी स्वत: मातोश्रीवर हनुमंत पिंगळे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले . 
कर्जत मतदार संघात सुरुवातीपासून अनेकजण तिकीटासाठी इच्छुक होते. माजी आमदार देवेंद्र साटम, किसन शेलार, सावळाराम जाधव, भाई शिंदे या प्रमुखांसह एकूण 13 जण यासाठी इच्छुक होते. मातोश्रीवर तीन वेळा इच्छुकांसोबत स्वत: उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी उमेदवार जाहीर केला. या प्रक्रियेतून मी अलिप्त होतो, तरीही थोरवे नाहक पध्दतीने आरोप करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  
 
प्रचाराला वेग               
खालापूर : कर्जत विधानसभेमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांनी आपल्या खालापूर प्रचाराचा शुभारंभ अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड गणपतीचे दर्शन घेवून केला. यावेळी  कार्यकत्र्याच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. यावेळी खालापूर प्रचार प्रमुख नवीन घाटवळ, नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, खोपोली शहर अध्यक्ष कुलदीपक शेंडे, तालुका प्रमुख विजय पाटील, नरेश पाटील, शंकर मानकवळे, अंकित साखरे , पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय पुरी, संतोष बैलमारे आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. खालापूर तालुक्यात प्रचाराची सुरु वात लाड यांनी केली. सुरेश लाड यांच्या विकास निधी अंतर्गत या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात विकास कामे करण्याचा प्रयत्न केल्याचे लाड यांनी सांगितले.