बुलेट ट्रेनच्या मार्गाला गोदरेजचा विरोध, भूखंड संपादनाविरुद्ध उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:46 AM2018-07-10T06:46:21+5:302018-07-10T06:46:36+5:30

विक्रोळी येथे मोक्याच्या ठिकाणचा भूखंड बुलेट ट्रेनसाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गोदरेजने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Godrej's protest against the bullet train route | बुलेट ट्रेनच्या मार्गाला गोदरेजचा विरोध, भूखंड संपादनाविरुद्ध उच्च न्यायालयात

बुलेट ट्रेनच्या मार्गाला गोदरेजचा विरोध, भूखंड संपादनाविरुद्ध उच्च न्यायालयात

googlenewsNext

मुंबई : विक्रोळी येथे मोक्याच्या ठिकाणचा भूखंड बुलेट ट्रेनसाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गोदरेजने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विक्रोळी येथून भुयारी मार्गाने काढण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनची मार्गिका बदलावी, अशी विनंती गोदरेजने याचिकेद्वारे केली आहे. अहमदाबाद-मुंबई यादरम्यान धावणाºया बुलेट ट्रेनचा ५०८.१७ कि.मी.चा ट्रॅक असणार आहे. त्यापैकी २१ कि.मी. भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गाचा एक बोगदा विक्रोळीला आहे. त्यासाठी गोदरेजची काही जागा संपादित करण्यात येणार आहे.

बुलेट ट्रेनची ही मार्गिका बदलावी. त्यामुळे गोदरेजला इन्फ्रास्ट्रक्चर आर्म गोदरेज कन्स्ट्रक्शनची ८.६ एकर जागा वाचविणे शक्य होईल, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी ३१ जुलै रोजी आहे. केंद्र सरकारच्या या प्रकल्पाला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. कारण भूसंपादनाविरुद्ध गुजरात व महाराष्ट्रातील काही शेतकºयांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 

Web Title: Godrej's protest against the bullet train route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.