परदेशवारी झाली सोपी; पण पासपोर्टला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:42 AM2022-01-26T09:42:17+5:302022-01-26T09:44:09+5:30

कोरोनामुळे वेग घटला, संख्या निम्म्याहून कमी

Going abroad was easy; But the passport is delayed | परदेशवारी झाली सोपी; पण पासपोर्टला विलंब

परदेशवारी झाली सोपी; पण पासपोर्टला विलंब

googlenewsNext

मुंबई : कालानुरूप परदेशवारी सोपी झाली असली, तरी कोरोनामुळे त्यात बऱ्यापैकी आडकाठी आलेली दिसून येते. त्याची सुरुवात होते ती पासपोर्ट काढण्यापासून. कोरोनाकाळात पारपत्र कार्यालयांचे कामकाज धीम्या गतीने सुरू असल्यामुळे परदेशवारी करणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
पासपोर्ट काढण्याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या माध्यमातून राज्यात २०१४ ते २०२१ या काळात ८५ लाख ६० हजार ३७६ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट वितरणाची राज्याची सरासरी प्रतिवर्षी १३ लाख इतकी आहे. मात्र, कोरोनाने या मोहिमेची गती रोखली. राज्यात २०२० मध्ये केवळ ५ लाख ६६ हजार, तर २०२१ मध्ये ७ लाख ६४ हजार पासपोर्ट वितरित करण्यात आले. 

असा करा ऑनलाइन अर्ज
nhttp://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/procEFormSub या संकेतस्थळावर जा. तेथे सर्व माहिती भरून रजिस्टर करा. तुमचा लॉग-इन आयडी तयार होईल.
nत्यांनतर नवीन पासपोर्ट काढण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करा. जर तुम्ही पूर्वी पासपोर्ट काढला असेल तर री-इश्यू ऑफ पासपोर्ट या लिंकवर क्लिक करा. अर्जामध्ये आवश्यकता माहिती भरा, अर्ज ‘सबमिट’ करा.
nत्यानंतर पे ॲण्ड शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यावर व्हिव्ह सेव्हड्/ सबमिटेड ॲप्लिकेशनवर क्लिक करा. पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा अनिवार्य आहे.  

कार्यालयाची गरज  का?
आवश्यक कागदपत्रे आणि पावतीसह पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. तेथे कागदपत्रांची पडताळणी होते. ऑनलाइन ॲप्लिकेशन जनरेट केल्यावर ९० दिवसांच्या आत पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागते.

कोरोनामुळे संख्या निम्म्यावर
२०१४ पासूनची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी १३ लाख पासपोर्ट वितरित केले पहिल्या लाटेदरम्यान जवळपास ६ महिने कार्यालये बंद होती. त्यानंतर निर्बंधांसहित ती सुरू करण्यात आली. २०२० मध्ये केवळ ५ लाख ६६ हजार, तर २०२१ मध्ये ७ लाख ६४ हजार पासपोर्ट वितरित झाले.
 

Web Title: Going abroad was easy; But the passport is delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.