Join us  

उद्या घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक पाहा, तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 6:23 AM

अभियांत्रिकी कामांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवार, २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : अभियांत्रिकी कामांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवार, २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे.

मध्य रेल्वेवर कुठे? : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर.किती वाजता? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत.परिणाम काय? : सीएसएमटीवरून सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेतीन या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्या १५ मिनिटे उशिरा चालविल्या जातील. तर ठाण्यापुढील जलद सेवा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

पश्चिम रेल्वेवर कुठे? : बोरीवली-गोरेगाव अप-डाऊन धिम्या मार्गावर.किती वाजता? : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत.परिणाम काय? : बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन स्लो मार्गावरील सेवा अप आणि डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही अंधेरी आणि बोरीवली सेवा हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही सेवा चालविल्या जाणार नाहीत.

हार्बर रेल्वेवर कुठे? : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर. किती वाजता? : पनवेल - सीएसएमटीदरम्यान सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी - पनवेल/बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ या वेळेत बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत विशेष सेवा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालतील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.

टॅग्स :मुंबई लोकल