मेट्रोत बसून आता भिवंडीला जायचं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:52 PM2023-08-03T12:52:30+5:302023-08-03T12:53:28+5:30

"आता फ्लोअरिंग, फॉल - सीलिंग, दर्शनी भाग यांसारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पटऱ्यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. मार्गिकेची ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे."

Going to Bhiwandi now by taking metro | मेट्रोत बसून आता भिवंडीला जायचं...

मेट्रोत बसून आता भिवंडीला जायचं...

googlenewsNext

मुंबई : मेट्रो मार्ग-५ च्या ठाणे - भिवंडी दरम्यानची बांधकामे यशस्वीपणे पूर्णत्त्वाकडे गेली आहेत. त्यामुळे या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता मेट्रोतून भिवंडीला जाणे शक्य होणार आहे. धामणकर नाका मेट्रो स्थानकावरील शेवटच्या प्लॅटफॉर्म स्तरावरील एल. बीमच्या उभारणीसह या मार्गिकेवरील सर्व सहा स्थानक उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. या कामात १ हजार ९८ घटक उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पाइन, विंग्स, यू गर्डर्स, पिअर आर्म्स आणि एल. बीमचा समावेश आहे. हे करण्यासाठी ८०  ते ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा आणि पुलर हायड्रोलिक एक्सल ट्रेलरचा वापर करण्यात आला असून, सद्यस्थितीत प्रकल्पातील स्थानकांसाठीचे ७३.३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

आता फ्लोअरिंग, फॉल - सीलिंग, दर्शनी भाग यांसारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पटऱ्यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. मार्गिकेची ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे. 
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए 

 नागरिकांचे पुनर्वसन 
धामणकर नाका मेट्रो स्थानकाच्या एल बीम उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनच्या सुरक्षित हालचालींसाठी समस्या येत होती. त्यासाठी त्या भागातील पुनर्वसन अनिवार्य होते. स्थानकाच्या उजव्या बाजूनंतर डाव्या बाजूची बांधकामे पाडून नागरिकांचे पुनर्वसन करून हे काम  पार पाडले.

 अवजड वाहतुकीचा सामना 
कशेळी, काल्हेर आणि अंजूरफाटा स्थानकांवर प्रीकास्ट घटकांच्या उभारणीसाठी भिंती पाडल्या. काम पूर्ण झाल्यानंतर भिंती पूर्ववत करण्यात आल्या.  उच्चदाब विद्युत वाहिनीलगतच्या उभारणीसाठी अवजड वाहतुकीचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करण्यात आली.
मात्र, या अडथळ्यांवर मात करण्यात आली.

-  मेट्रो ट्रॅकसाठी उभारण्यात येणाऱ्या ११.८८ किमी व्हायाडक्टपैकी ९.८७ किलोमीटरच्या व्हायाडक्ट  उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे.
-  ज्यासाठी एकूण १२१८ पूर्वानिर्मित घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले.
-  पिअर कॅप, यू गर्डर, आय गर्डर, बॉक्स गर्डर, पॅरापेट वॉलचा यामध्ये समावेश आहे.
-  ८०.५ टक्के मेट्रो ट्रॅकसाठीचा व्हायाडक्ट आता पूर्ण झाला आहे.

मेट्रो मार्ग ५ 
ठाणे - भिवंडी - कल्याणदरम्यान २४.९ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे.
एमएमआरडीएमार्फत ठाणे ते भिवंडी दरम्यान ११.८८ किमी लांबीचे बांधकाम करण्यात येत आहे.
पहिला टप्पा ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होऊन धामणकर नाका, भिवंडी येथे संपतो.
बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका ही पहिल्या टप्प्यातील सहा स्थानके आहेत.
 

 

Web Title: Going to Bhiwandi now by taking metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.