मुंबई : गोखले पूल सुरू होण्यासाठी नागरिकांना फक्त वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पालिकेकडून पुलाची एक मार्गिका येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत खुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही मार्गिकेचे अंतिम टप्प्यातील ८ ते १० दिवसांचे काम बाकी आहे. पालिकेच्या या वारंवार हुकणाऱ्या डेडलाइनमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गोखले पुलाच्या कामासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन यापूर्वी आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, प्रकल्प सल्लागार यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत काही तांत्रिक कारणांमुळे पुलाच्या एका मार्गिकेचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होऊ शकणार नसल्याने २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
पुलाची सद्य:स्थिती काय?
१) गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेला पहिला गर्डर डिसेंबरमध्ये बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे पुलाची एक मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सेवेत येईल, असे म्हटले जात होते.
२) एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, काही तांत्रिक कामे बाकी असून, सपाटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच एस. व्ही. रोड बाजूच्या ॲक्सेस आणि मॅस्टिक लेयरचे काम सुरू आहे. या कामाला आठ ते दहा दिवस लागू शकतात. हे काम पूर्ण झाल्यावर पूल दुतर्फा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.’हिरोज ऑफ मुंबई’ देणार मुंबईकरांना स्फूर्ती.
३) काम अंतिम टप्प्यात येऊनही ते पूर्ण व्हायला आणखी १० दिवस लागणार असल्याची माहिती स्थानिक आमदार अमित साटम यांनी दिली.