Join us

गोखले पुलाच्या कामाचा लोकल प्रवाशांना फटका; पश्चिम रेल्वेच्या वेळेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 9:50 AM

मुंबई महापालिकेकडून अंधेरी येथील गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून अंधेरी येथील गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम वेगाने आणि नीटनेटके व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेने लोकलच्या वेळेत बदल केले आहेत. शिवाय, लोकल रद्द करण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला असून, लोकलच्या या बदलत्या वेळपत्रकाचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

मध्यरात्री १:४० ते पहाटे ४:४० पर्यंत  हार्बर लाइन, धीम्या मार्गावर व जलद मार्गावर तसेच ५, ६ व्या मार्गावर ब्लॉक  घेण्यात येणार असून, त्यामुळे ४ जानेवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांत विरार-अंधेरी, अंधेरी-विरार, वसई रोड-अंधेरी लोकल वसई रोडवरून सुटते,  अंधेरी-चर्चगेट  या लोकलचा समावेश आहे.

लोकलचे बदललेले वेळापत्रक :

 लोकल क्रमांक ९२०४२ विरार-चर्चगेट लोकल विरारहून ८:०१ वाजता सुटते. आता विरारहून ७:५५ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०१६ विरार-चर्चगेट एसी लोकल विरारहून ७:५६ वाजता सुटते. आता विरारहून ७:५९ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९२०२७ चर्चगेट-चर्चगेटहून ६:४० वाजता सुटणारी विरार लोकल आता चर्चगेटहून ६:३२ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९२०६७ चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटहून ९:२७ वाजता सुटते. आता चर्चगेटहून ९:१९ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०१९ चर्चगेट-विरार एसी लोकल चर्चगेटहून ९:१९ वाजता सुटते. आता चर्चगेट येथून ९:२३ वाजता सुटेल.

 लोकल क्रमांक ९४०२१ चर्चगेट-बोरिवली एसी लोकल चर्चगेटहून ९:२४ वाजता सुटते. आता चर्चगेट येथून ९:२७ वाजता सुटेल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका :

  ट्रेन क्रमांक १९०३८ बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस बोरिवली येथे ४५ मिनिटांनी नियमित केली जाईल. वांद्रे टर्मिनसवर ६० मिनिटे उशिरा पोहोचेल. गाडी क्रमांक २०९४२ गाझीपूर सिटी-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस बोरिवली येथे ३० मिनिटांनी नियमित केली जाईल आणि वांद्रे टर्मिनसला ५४ मिनिटे उशिराने पोहोचेल. 

ट्रेन क्रमांक २२९४६ :

ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल सुरत-बोरिवली सेक्शनवर ३० मिनिटांनी नियमित होईल आणि मुंबई सेंट्रलला ३० मिनिटे उशिराने पोहोचेल. 

टॅग्स :अंधेरीनगर पालिका