नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी स्टॉकिस्ट आणि व्यापा:यांकडून लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी झाल्याने सोन्याचा भाव वधारला. 85 रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 28,71क् रुपये झाला. चांदीही 1क्क् रुपयांच्या तेजीसह 44,8क्क् रुपये प्रतिकिलो झाली.
जागतिक बाजारातही हाच कल दिसून आला. न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव क्.क्5 टक्क्यांनी वाढून 1,319 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव क्.14 टक्क्यांनी वधारून 2क्.93 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 85 रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे 28,71क् रुपये आणि 28,51क् रुपये प्रति दहा गॅ्रम राहिला. मंगळवारी यात 16क् रुपयांनी घट झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांनी वाढून 44,8क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 3क् रुपयांनी महाग होऊन 44,2क्क् रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 79,क्क्क् आणि विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)