विमानाच्या स्वच्छतागृहात लपवले अडीच कोटींचे सोने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:29 IST2025-01-03T13:29:15+5:302025-01-03T13:29:38+5:30
सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी १० लाख रुपये आहे.

विमानाच्या स्वच्छतागृहात लपवले अडीच कोटींचे सोने
मुंबई : मालदीवची राजधानी माले येथून आलेल्या २४ वर्षीय तरुणाला विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्याने हे सोने विमानातील स्वच्छतागृहात लपवल्याचे आढळले. सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी १० लाख रुपये आहे.
इनामूल हुसेन असे आरोपीचे नाव असून तो कर्नाटकचा आहे. तो सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तो येत असलेल्या विमानापाशी सापळा रचला होता. तो विमानातून बाहेर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने सोने तस्करी केल्याची कबुली दिली तसेच हे सोने विमानातील स्वच्छतागृहात लपवल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृहात तपासणी केली असता १३ पाकिटांतून हे सोने आढळून आले.