Join us

सोने दोन हजारांनी गडगडले; खरेदीचा उत्साह

By admin | Published: April 22, 2015 6:00 AM

सोन्याचे भाव वधारल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. मात्र गेल्या पंधरवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीसोन्याचे भाव वधारल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. मात्र गेल्या पंधरवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भावही दोन हजारांनी गडगडले. त्यामुळे अक्षय्य तृतियेला मंगळवारी ग्राहकांएवढाच ज्वेलर्स विक्रेत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गुढीपाडव्यालाही यशस्वी वाढ झाल्याने ज्वेलर्स विके्रत्यांनी अक्षय तृतियेनिमित्त विविध क्लृप्त्या लढवत गतवर्षीची तूट भरुन काढण्यासाठी कंबर कसल्याचेही दिसून आले. त्यामुळे अल्पावधीतच या व्यवसायाला आलेली मरगळ कमी होईल असा विश्वास विके्रत्यांमध्ये आहे. त्यामुळे राज्यामध्ये शेकडो कोटींहून अधिक उलाढाल होण्याचीही शक्यता आहे. आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे मुंबई विभागीय अध्यक्ष नितिन कदम यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दली. सोन्याच्या खरेदीतही तोळयामागे सुमारे दोन हजार रुपये एवढा मोठा फरक पडत आहे. त्यामुळे गतवर्षी या दिवशी सोने सुमारे २९ हजार ५०० प्रती तोळा होते तर यंदा तेच २७ हजार ५०० ऐवढे आहे. जागतिक बाजारपेठेने पुन्हा उसळी घेण्याच्या आता सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा असल्याने या उलाढालीचा उच्चांक गाठला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक व्यावसायिकांमध्ये या सणानिमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. त्यामध्ये कोणी घडणावळ कमी करत आहे तर कोणी ती माफ करत आहे, मात्र त्यासाठी खरेदीच्या विशिष्ट मर्यादेचे बंधन घालण्यात आले आहे. काही व्यापा-यांनी विशिष्ट रकमेच्या खरेदीवर आकर्षक वस्तू भेट देण्याची योजना केली आहे. आगामी काळात लग्न, साखरपुड्याचे मुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी वधू-वरांएवढीच सर्वांचीच खरेदीची मानसिकता आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी हिऱ्यांसाठी घडणावळ माफ केली आहे.