मुंबई: तुम्ही तस्करीच्या अनेक बातम्या वाचल्या, ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॉफीच्या बॉटेलमधून कॉफीऐवजी सोने निघाल्याने तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. आश्चर्यचकीत होणारच, कारण ही तस्करीची नवी युक्ती होती. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
3.8 किलो सोने जप्तमुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले आहे. अधिकाऱ्यांनी केनियाहून आलेल्या 18 महिलांची तपासणी केली, या तपासणी अधिकाऱ्यांना काहीतरी गडबड आढळली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कॉफी बॉटेलची तपासणी केली असता, बॉटेलमधून कॉफीऐवजी 3.8 किलो सोने निघाले.
सोन्याची किंमत 1.52 कोटीया महिलांनी लहान रॉड/कांडी, वायर आणि पावडरच्या स्वरुपात हे सोने कॉफी पावडरच्या बाटल्या, अंतर्वस्त्र, पादत्राणे आणि मसाल्याच्या कुपींमध्ये लपवले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांकडून मिळालेल्या सोन्याची किंमत 1.52 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी एका महिलेला अटक केली आहे.