पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोन्याची मूर्ती; मुंबईतील कलाकाराने केली तयार, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:07 AM2023-01-14T06:07:38+5:302023-01-14T06:07:45+5:30
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन दिवसांपूर्वी बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती फिरताना दिसत आहे.
मुंबई : बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात एका कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५६ ग्रॅम सोन्याची मूर्ती तयार केली आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मोदी यांची लोकप्रियता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत याच्यापेक्षा जास्त आहे असे लोकांचे म्हणणे आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन दिवसांपूर्वी बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती फिरताना दिसत आहे. त्या मूर्तीखाली १५६ ग्रॅम वजन असल्याचे नमूद आहे. इतक्या कमी सोन्याचा वापर करून सुंदर मूर्ती बनविण्यात आली आहे, अशा शब्दांत तज्ज्ञांनी कारागिराचे कौतुक केले आहे. मात्र, त्या व्हिडिओमध्ये कलाकाराचे नाव नाही. धनतेरसला इंदोरमध्ये एका सोनाराच्या दुकानात नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती विकल्या होत्या. मुंबईतील एका सोनाराने ऑर्डर देऊन या मूर्ती तयार केल्या होत्या.