मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: June 10, 2024 04:45 PM2024-06-10T16:45:12+5:302024-06-10T16:46:29+5:30

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांकडून तब्बल १९ कोटी १५ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.

gold worth 19 crores seized at mumbai airport customs department action | मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मनोज गडनीस, मुंबई:  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांकडून तब्बल १९ कोटी १५ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. या दोन्ही महिला परदेशी नागरिक असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याचे वजन ३२ किलो इतके आहे. परदेशातून येणाऱ्या एका विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

 त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी त्या विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. या विमानातून उतरलेल्या दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या पैकी एका महिलेने तिच्या अंर्तवस्रात सोने लपविल्याचेही आढळून आले. या खेरीज त्यांच्या बॅगातही चोर कप्पे होते. त्यात देखील सोने लपविण्यात आले होते.

Web Title: gold worth 19 crores seized at mumbai airport customs department action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.