मुंबई विमातळावर पकडले ६ कोटींचे सोने, सीमा शुल्क विभागाची कारवाई
By मनोज गडनीस | Published: April 1, 2024 06:01 PM2024-04-01T18:01:03+5:302024-04-01T18:02:21+5:30
या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. याचसोबत, ३७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देखील जप्त केले आहेत. याची भारतीय चलनातील किंमत २० लाख रुपये इतकी आहे.
मुंबई - गेल्या २७ ते ३१ मार्च अशा चार दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध कारवायांदरम्यान एकूण १० किलो ७० ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. याचसोबत, ३७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देखील जप्त केले आहेत. याची भारतीय चलनातील किंमत २० लाख रुपये इतकी आहे.
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या युनिट - ३ ने ही कारवाई केली आहे. परिधान केलेले कपडे, केबिन बॅग तसेच बॅगेत चोर कप्पे तयार करत त्यामध्ये हे सोने लपविल्याचे आढळून आले आहे. एका प्रकरणात एका प्रवाशाने अंतर्वस्त्रात देखील सोने लपविल्याचे आढळून आले. या कारवाई दरम्यान सीमा शुल्क बुडवून आणलेले काही मोबाईल फोन, लॅपटॉप, विविध प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने देखील जप्त करण्यात आली आहेत.