Join us

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 6:30 AM

केनिया, जेद्दा, दुबई, रसलखैमा येथून मुंबईत येणाऱ्या विमानांद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईविमानतळावर सात प्रकरणांमध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ किलो ४२७ ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. याशिवाय ४२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त केल्या आहेत. यामध्ये मोबाइल आणि टॅब्लेटचा समावेश आहे.

केनिया, जेद्दा, दुबई, रसलखैमा येथून मुंबईत येणाऱ्या विमानांद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या विमानांबाहेर सापळा रचला होता. या विमानांतून येणाऱ्या काही प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांच्या साहित्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश झाला.

टॅग्स :सोनंमुंबईविमानतळ