मनोज गडनीस
मुंबई - गेल्या तीन दिवसांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान साडे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. दुबई, सिंगापूर, अबुधाबी येथून प्रामुख्याने या सोन्याची तस्करी मुंबईत झाल्याची माहिती आहे. सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या रुपात सोने भारतात आणण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, या कारवाई दरम्यान सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ६ किलो ११ ग्रॅम सोने जप्त केले आहे. हँड बॅग, परिधान केलेले कपडे, चेक-इन बॅग तसेच बॅगेत चोर कप्पे तयार करत त्यामध्ये हे सोने लपविल्याचे आढळून आले. या खेरीज एका प्रवाशाकडील २० हजार अमेरिकी डॉलर देखील जप्त करण्यात आले आहेत, तर सीमा शुल्क न भरता परदेशातून भारतात आणलेले काही मोबाईल फोन्स देखील अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.