Join us

पुण्याला ‘गोल्डन सिटी’चा मान

By admin | Published: May 19, 2017 3:38 AM

आपल्या संरक्षणासाठी रात्र- दिवस राबणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी पोलीस डान्स कॅम्प (पीडीसी) आणि डी मंच आयोजित राज्यस्तरीय पोलिसांच्या मुलांची नृत्य

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या संरक्षणासाठी रात्र- दिवस राबणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी पोलीस डान्स कॅम्प (पीडीसी) आणि डी मंच आयोजित राज्यस्तरीय पोलिसांच्या मुलांची नृत्य स्पर्धा घेण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नागपूर आणि अमरावती ही शहरे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली. स्पर्धेचा अंतिम सोहळा बुधवारी रात्री दादर-नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रंगला. अंतिम फेरीत पुणे शहरातील पोलिसांच्या मुलांनी सर्वोत्तम नृत्याचे प्रदर्शन घडवत, ‘गोल्डन सिटी’चा मान मिळवला. तर औरंगाबाद शहराला सिल्व्हर आणि नागपूर शहराला ब्रॉन्झ सिटीचा बहुमान मिळाला.अंतिम सोहळ्यासाठी पोलीस उपायुक्त संजय पाटील, ‘लोकमत’ मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, डॉ. अनिल मुरेका, प्रीती चावला, इशान मसीह हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रवी बेहल, शैमक दावर, मर्जी पिस्टंजी, नावेद जाफरी आणि अहमद खान हे नृत्य आणि सिनेजगतातील मान्यवर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते. पोलीस डान्स कॅम्प ही संस्था पोलिसांच्या मुलांना नृत्य, अभिनय, गायन आणि इतर कलाक्षेत्रात वाव मिळावा व नाव कमावता यावे म्हणून विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील पोलिसांच्या मुलांसाठी १५ एप्रिलपासून नृत्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये राज्यभरातून तब्बल तीन हजार मुले सहभागी झाली. त्यामधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा शहरांतून प्रत्येकी आठ, अशा एकूण ४८ मुलांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम ४८ मुलांसाठी १० दिवसांच्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचे मुंबईत आयोजन करण्यात आले. या मुलांना नृत्य आणि सिनेजगतातील अनेक दिग्गजांकडून नृत्याचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. त्यामध्ये रेमो डिसूझा, फुलवा खामकर, फिरोझ खान या नृत्य दिग्दर्शकांकडून मार्गदर्शन मिळाले. दहा दिवस सहा नृत्य दिग्दर्शकांनी या सहा संघांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. - पोलीस डान्स कॅम्प ही संस्था पोलिसांच्या मुलांना नृत्य, अभिनय, गायन आणि इतर कलाक्षेत्रात वाव मिळावा व नाव कमावता यावे, म्हणून विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील पोलिसांच्या मुलांसाठी नृत्य शिबिराचे आयोजन केले होते. - या मुलांना नृत्य आणि सिनेजगतातील अनेक दिग्गजांकडून नृत्याचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. त्यामध्ये रेमो डिसूझा, फुलवा खामकर, फिरोझ खान या नृत्य दिग्दर्शकांकडून मार्गदर्शन मिळाले.