पेंग्विनमुळे राणीबागेला आले ‘अच्छे दिन’! पर्यटकांची संख्याही ३० टक्क्यांनी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:36 AM2018-06-03T02:36:34+5:302018-06-03T02:36:34+5:30
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात, राणीबागेत नव्या पाहुण्यांच्या रूपात आणलेल्या पेंग्विनमुळे तिकीट दरवाढ करण्यात आली. परिणामी, राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचा आरोप विरोधकांमधून केला जात होता.
- चेतन ननावरे
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात, राणीबागेत नव्या पाहुण्यांच्या रूपात आणलेल्या पेंग्विनमुळे तिकीट दरवाढ करण्यात आली. परिणामी, राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचा आरोप विरोधकांमधून केला जात होता. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात पेंग्निनमुळे राणीबागेत आलेल्या पर्यटकांची आकडेवारी ३० टक्क्यांनी वाढली असून, मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात तब्बल ६ पटीने वाढ झाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०१६ साली मुंबईत पेंग्विनचे आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर मुंबईकरांसह देशात पेंग्विन पाहण्याची चर्चा रंगू लागली होती. येथील वातावरणाशी पेंग्विनने जुळून घेतल्यानंतर, अखेर जानेवारी २०१७ पासून पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांना प्रदर्शन पिंजºयात ठेवण्यात आले. त्याच वेळी राणीबागेच्या तिकीटदरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडण्यात आला. मात्र, बºयाच विरोधानंतर अखेर सहा महिने पर्यटकांना जुन्याच दराने म्हणजे २ रुपये व ५ रुपये दराने पेंग्विन पाहता आले. त्या वेळी तासनतास रांगेत उभे राहून रोज हजारो पर्यटक राणीबागेत येत होते.
अखेर प्रशासनाने १ आॅगस्टपासून तिकीटदरात तब्बल २० पट वाढ करत नवे दर आकारणी सुरू केली. मात्र, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट होऊन मनपाला महसुलाला मुकावे लागेल, असे विविध आरोप व शंका विरोधकांमधून उपस्थित केल्या जात होत्या, पण या सर्व शंकांना पूर्णविराम देत, पर्यटकांनी आपली पहिली पसंती राणीबागेला असल्याचे दाखवून दिले आहे.
पर्यटकांनी गाठला लाखांचा आकडा
२०१६-१७ या आर्थिक वर्षातील २०१६ साली एप्रिल, मे महिन्यांत, तर २०१७ सालच्या नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च या महिन्यांत एक लाखांहून अधिक पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली होती. मात्र, पेंग्विन आगमनामुळे २०१७ साली एप्रिल, मे, जून, जुलै, आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांसह २०१८ सालातील जानेवारी, फेब्रुवारी या ९ महिन्यांत प्रत्येक महिन्याला एक लाखांहून अधिक पर्यटकांनी पेंग्विन दर्शनासाठी गर्दी केली.
महसूल कोटींच्या घरात!
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षात राणीबागेला १३ लाख ८० हजार २७१ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे मनपा प्रशासनाला ७३ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
पेंग्विनच्या आगमनामुळे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान राणीबागेला भेट दिलेल्या पर्यटकांचा आकडा साडेतीन लाख पर्यटकांनी वाढला. या वर्षी तिकीट दरवाढीनंतरही १७ लाख २२ हजार ६५६ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिल्याने, मनपाला तब्बल ४ कोटी ३७ लाख ५३ हजार रुपयांचा महसूल मिळाला.