झोपडीधारकांना ‘अच्छे दिन’!

By Admin | Published: March 29, 2016 02:22 AM2016-03-29T02:22:52+5:302016-03-29T02:22:52+5:30

शहरासह उपनगरांतील झोपडपट्टीवासीयांना ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण व संरक्षक भिंती येत्या आर्थिक

'Good day' to the hutment dwellers! | झोपडीधारकांना ‘अच्छे दिन’!

झोपडीधारकांना ‘अच्छे दिन’!

googlenewsNext

मुंबई : शहरासह उपनगरांतील झोपडपट्टीवासीयांना ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण व संरक्षक भिंती येत्या आर्थिक वर्षात उभारण्यात येणार आहेत.
नागरिकांचे जीवनमान सुखकर करण्याची हमी म्हाडाने दिली आहे. सोमवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत २०१६-१७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यात उपरोक्त बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात
आले आहे.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सौंदर्यीकरण, संरक्षक
भिंती बांधणे इत्यादी कार्यक्रमांतून सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या वर्षभरात
६८० इमारतींची दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट म्हाडाने ठेवले आहे.
दरम्यान, मुंबईसारख्या महानगरातच परवडणारे घर चाकरमान्याला घेता यावे म्हणून प्राधिकरणाने कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)

घरांसाठी २५७.९० कोटींची जमीन खरेदी
घरांसाठी जमीन खरेदी करता यावी आणि तिचा विकास करता यावा म्हणून अर्थसंकल्पात २५७.९० कोटींची तरतूद केली आहे.
२०१५-१६ या वर्षात मुंबई मंडळाकडे लॉटरी झालेल्या सर्वच इमारतींची भोगवटा पत्रे प्राप्त करून वितरणाचा जोरदार धडाका लावला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातून चालू वर्षी १ हजार २०० कोटींपर्यंत रक्कम घरे विक्रीतून वसूल झाली आहे.
पुणे आणि कोकण मंडळाकडील निर्माण झालेल्या घरांचा विक्री कार्यक्रम २०१६-१७ साठी तयार करण्यात आला आहे. २०१६-१७ मध्ये या घरांच्या विक्रीद्वारे संपूर्ण राज्यातून जवळपास ३ हजार ५०० कोटी प्राप्त होतील, असा दावाही म्हाडाने केला आहे.

1मुंबई शहर आणि उपनगरातील गृहप्रकल्पांतील घरांचे दर गगनाला भिडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य चाकरमानी मुंबईत घर विकत घेऊ शकणार नाही अशी स्थिती आहे. आणि उरलासुरलेला मुंबईकर परवडणाऱ्या दरांच्या घरांसाठी मुंबईबाहेर फेकला गेला आहे. खासगी विकासकांच्या गृहप्रकल्पातील घरे परवडणारी नसल्याने मुंबई महानगर प्रदेशातील घरविक्री मंदावत असल्याचे चित्र आहे.
2महत्त्वाचे म्हणजे गतवर्षी मुंबईत सुमारे दोन लाख घरांची विक्री झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. शिवाय गृहप्रकल्पांमध्ये ४७ %घट झाल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले होते. विशेष म्हणजे बांधकाम साहित्याचे भावही वाढल्याने खासगी बांधकाम विकासकांची दैना झाली असून, बांधकाम साहित्याचे अव्वाच्या सव्वा दर गृहविक्रीवर परिणाम करत आहेत.

डिजिटायझेशनवर भर
म्हाडाने डिजिटायझेशन कार्यक्रमावर भर देण्याचे ठरवले आहे. कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी म्हाडा प्रशासनाने पावले उचलली आहेत. कार्यालयीन कामकाजात अधिकाधिक संगणकाचा वापर करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

‘मित्र’ प्रणालीसाठी आग्रह
संगणकीकरणाच्या माध्यमातून राज्यभर ‘मित्र’ प्रणालीच्या सर्व सेवा इंटरनेटद्वारे सामान्य जनतेसाठी उपलब्ध होण्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 'Good day' to the hutment dwellers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.