मुंबई/नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस साजरा होता. आपल्या वाढदिवस दिनी ते नागपुरातील घरीच असून तेथे चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि भाजप नेत्यांच्या शुभेच्छा स्विकारत आहेत. गडकरी (Nitin Gadkari) यांनी नातवंडं, कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापला. यावेळी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी जमली होती. देशभरातून गडकरींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची निवासस्थानी मोठी रीघ लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ''आमचे नेते, मार्गदर्शक, माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या !देशहिताचे कार्य करत राहण्यासाठी त्यांना आणखी बळ मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो'', असे यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तत्पूर्वी, फडणवीसांनी त्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केलं. या सोहळ्यात भाषण करताना त्यांनी एक डायलॉगही मारला.
अन्दाज़ कुछ अलग हैं उनके सोचने का ! सबको मंजिल का शौक है और उन्हें रास्ते बनाने का !!
असा डायलॉग देवेंद्र यांनी भाषण करतेवेळी मारला. तसेच, विरोधकांवर टीका करत, ह्या सरकारने गतीमान पद्धतीने हा समृद्धी महामार्ग बनविल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आज नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही तोच डायलॉग लिहून गडकरी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गडकरी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महामार्ग बनवले, उड्डाण पुलं बनवले, नव्याने रस्त्यांची निर्मित्ती केली. त्याला अनुसरुन हा डायलॉग आहे.
अन्दाज़ कुछ अलग हैं उनके सोचने का ! सबको मंजिल का शौक है और उन्हें रास्ते बनाने का !!
असे म्हणत अमृता फडणवीस यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या लोकार्पण सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी भाषण करताना हा डायलॉग म्हटलं होता.