गुड न्यूज! ७,२३१ पोलिसांची भरती होणार; गृहमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:10 PM2022-03-14T21:10:33+5:302022-03-14T21:19:56+5:30
Police Recruitment in Maharashtra : विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मुंबई - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. नव्या पोलीस भरतीची घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेनुसार ७ हजार २३१ पोलिसांची भरती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. तसेच फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनचे सीआयडी चौकशी करण्याबाबत वळसे पाटील यांनी घोषणा केली. दरम्यान वळसे पाटील यांनी सोशल मीडियातून सातत्यानं पोलीस भरती कधी करणार? असं विचारणा होत असल्याचं सांगितलं. या निमित्ताने मी २०१९ रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ५,२९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, याच्या नेमणुका देणं बाकी आहे. पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७,२३१ पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
ही भरती करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेण्यात येईल. यानंतर पुढील दोन वर्षात जी भरती होईल, त्याचा प्रस्तावही आम्ही मंत्रिमंडळात मांडणार आहोत. त्यालाही मंजुरी मिळाली तर अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल असे पुढे वळसे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनची होणार सीआयडी चौकशी, दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय