शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:20 PM2019-07-24T15:20:14+5:302019-07-24T15:38:45+5:30

राज्य सरकारने शासन निर्णय काढून ही वाढ करण्याचे आल्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे

Good news for farmers! Extension by the government to fill out a crop insurance application | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ

Next
ठळक मुद्देराज्य सरकारने शासन निर्णय काढून ही वाढ करण्याचे आल्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेजुलै महिना संपत आला असला तरी, पश्चिम विदर्भात अद्याप पावसाचा पत्ता नाही.

मुंबई - केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी पीक विमा अर्ज दाखल करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत देण्यात आली होती. मात्र, अर्ज करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने शासन निर्णय काढून ही वाढ करण्याचे आल्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार 25 जुलै ते 29 जुलै अशी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज दाखल करुन केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच, संबंधित विमा कंपन्यांना याबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी राज्यपाल यांच्या आदेशान्वये हे परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, पीक विम्याचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने शेतकरी पीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेंचे उंबरठे झिजवित आहेत. पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला होता. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळेच पीक विमा भरण्यासाठी मुतदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. राज्य सरकारने याची दखल घेत पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. 



जुलै महिना संपत आला असला तरी, पश्चिम विदर्भात अद्याप पावसाचा पत्ता नाही. सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली ती कायम आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भवासीयांचे पीक संकटात आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, नमुना आठ, स्वयं घोषित पेरेपत्रक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स स्कॅन करून ऑनलाइन विमा काढावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने इंटरनेटच्या नेटवर्कवर अवलंबून आहे. पीक विमा काढण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना तासन्तास सायबर कॅफेत बसण्याची वेळ येत आहे. 

Web Title: Good news for farmers! Extension by the government to fill out a crop insurance application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.