शेतकऱ्यांना गुडन्यूज, IT क्षेत्रालाही खुशखबर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:54 PM2023-05-30T16:54:32+5:302023-05-30T18:23:09+5:30

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णयांची माहिती दिली

Good news for farmers, good news for IT sector too; Major decisions in the cabinet meeting, Says by Devendra Fadanvis | शेतकऱ्यांना गुडन्यूज, IT क्षेत्रालाही खुशखबर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

शेतकऱ्यांना गुडन्यूज, IT क्षेत्रालाही खुशखबर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

googlenewsNext

मुंबई - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणांचा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेतून वार्षिक ६ हजार रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यासोबतच, १ रुपयांत पीकविमाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णयांची माहिती दिली. त्यामध्ये, महिलांसाठी, वस्त्रोद्योगासाठी, आयटी क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून कोट्यवधींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मित्ती होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.

‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.

सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता

महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय

अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार

नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता

Web Title: Good news for farmers, good news for IT sector too; Major decisions in the cabinet meeting, Says by Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.