गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:47 AM2023-06-27T08:47:12+5:302023-06-27T08:48:11+5:30

विशेष गाड्यांच्या ८० फेऱ्यांना पेण स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे.

Good news for Ganesha devotees, now special trains stop in Pen! | गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा!

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा!

googlenewsNext

मुंबई : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने गणपती उत्सवादरम्यान प्रवास सुकर करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

गणपती सणाला होणारी गर्दी लक्षात घेता दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १५६ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. या विशेष गाड्या मुंबई ते सावंतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ, दिवा ते रत्नागिरी आणि मुंबई ते मडगावदरम्यान धावणार आहेत. दरम्यान, आता मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की, विशेष गाड्यांच्या ८० फेऱ्यांना पेण स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेने ट्विट केले आहे. यात गणपती उत्सवासाठी रेल्वेच्या १५६ फेऱ्या मध्य रेल्वेने जाहीर केल्या होत्या. यानंतर प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे ८० फेऱ्यांना पेण स्टेशन येथे थांबे जाहीर करत आहे, असे म्हटले आहे. तसेच, ०११७१/७२- सीएसएमटी-सावंतवाडी विशेष- ४० फेऱ्या आणि ०११५३/५४- दिवा- रत्नागिरी या गाड्यांच्या विशेष- ४० फेऱ्या असणार आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई-सावंतवाडी रोड ट्रेन सीएसएमटी येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत रोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११७२ विशेष सावंतवाडी रोडवरून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत रोज दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. एलटीटी ते कुडाळ गाडीच्या २४ फेऱ्या आहेत. ट्रेन क्रमांक ०११६७ स्पेशल एलटीटी १३, १४, १९, २०, २१, २४ ते २८ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक ०११६८ स्पेशल कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २५ ते २९ आणि ऑक्टोबर २, ३ रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता एलटीटीला पोहोचेल. 

पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष गाडीच्या ६ फेऱ्या आहेत. ट्रेन क्रमांक ०११६९ विशेष गाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुण्याहून सायंकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळला पोहोचेल; तर ट्रेन क्रमांक ०११७० स्पेशल कुडाळहून १७, २४ आणि १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी ५.५० वाजता पोहोचेल. करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) गाडीच्या ६ फेऱ्या आहेत. ट्रेन क्रमांक ०११८७ ही गाडी १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पनवेलला पोहोचेल. 

ट्रेन क्रमांक ०११८८ स्पेशल पनवेलहून १७, २४ आणि १ ऑक्टोबर रोजी ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता कुडाळला पोहोचेल. दिवा -रत्नागिरी मेमू स्पेशल (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या आहेत. ट्रेन क्रमांक ०११५३ स्पेशल दिवा येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ७.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५४ विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ३.४० वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता दिवा येथे पोहोचेल.

मुंबई-मडगाव विशेष (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०११५१ सीएसएमटी येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत रोज ११.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५२ मडगावहून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी दररोज ३.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

असे करा आरक्षण
१५६ गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण २७ जून २०२३ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहेत.

Web Title: Good news for Ganesha devotees, now special trains stop in Pen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.