गिरणी कामगारांना खुशखबर! कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ

By सचिन लुंगसे | Published: December 14, 2023 07:44 PM2023-12-14T19:44:48+5:302023-12-14T19:45:04+5:30

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी १४ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार्‍या अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.

Good news for mill workers Extension of Eligibility Verification Campaign for Workers and Inheritors | गिरणी कामगारांना खुशखबर! कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ

गिरणी कामगारांना खुशखबर! कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ

मुंबई : म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या लॉटरीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानाला १४ जानेवारीपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी १४ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार्‍या अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

कुठे कागदपत्रे द्यावी?
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळ असलेल्या समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत.
 
ऑनलाइनही सुविधा
१) ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे.
२) https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा आहे.

  •  तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने ९५ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
  •  त्यापैकी ७२ हजार ४१ अर्जदार पात्र ठरले.
  •  उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र / अपात्र निश्चिती सुरू आहे.      

 
कोणी कागदपत्रे द्यावी ?
सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या  वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी.
 
अडचण आली तर काय ?
काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
 
कोणती कागदपत्रे
१) पात्रता निश्चितीकरिता १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी.
२) गिरणी कामगारांचे ओळख पत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी   क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत.
३) आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.  

Web Title: Good news for mill workers Extension of Eligibility Verification Campaign for Workers and Inheritors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.