मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन
By मनोहर कुंभेजकर | Published: August 29, 2024 06:54 PM2024-08-29T18:54:44+5:302024-08-29T18:57:45+5:30
या गाडीला बोरिवली,वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल,रोहे,वीर,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,सावंतवाडी रोड,ठिवी,करमाळा आदी १३ स्टेशनांवर दोन्ही दिशेत थांबेल. या गाडीला एसी २ टायर,एसी ३ टायर इकॉनॉमी,स्लिपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.
मुंबई- बोरिवली रेल्वे स्थानकात कोकणासाठी सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस - मडगांव रेल्वेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज दुपारी २.२० मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवला.उद्या दि,३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ही गाडी मडगांवला पोहचेल.
सदर नियमित गाडी १०११६ मडगांव वरून दि,३ सप्टेंबर रोजी वांद्रे टर्मिनससाठी मंगळवार आणि गुरुवारी सकाळी ७.४० मिनिटांनी रवाना होईल आणि त्याच दिवशी रात्री ११.४० मिनिटांनी वांद्रे स्थानकात पोहचेल तर दि,४ सप्टेंबर पासून वांद्रे टर्मिनस वरून मडगांव साठी १०११५ बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६.५० मिनिटांनी रवाना होईल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगांवला पोहचेल.
या गाडीला बोरिवली,वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल,रोहे,वीर,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,सावंतवाडी रोड,ठिवी,करमाळा आदी १३ स्टेशनांवर दोन्ही दिशेत थांबेल. या गाडीला एसी २ टायर,एसी ३ टायर इकॉनॉमी,स्लिपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.
ही गाडी मुंबईचे पश्चिम उपनगरीय व्यस्त क्षेत्र आणि सुंदर तटीय मडगांव शहर यांच्यात कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.या गाडी मुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवाश्यांचा थेट कोकण भागाशी संपर्क होईल.तसेच येथील प्रवासी, विद्यार्थी आणि रोजगारासाठी नियमित प्रवास करणाऱ्या थेट,सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळेल.
पश्चिम घाट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नयनरम्य सह्याद्री च्या पर्वत रांगा मधून ही ट्रेन धावणार असल्याने पर्यटकांची पसंती मिळेल. तसेच व्यवसाय,पर्यटन व उद्योगाला फायदा होईल.