Join us

होळीपूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ‘रिलायन्स जिओ’चा स्वस्त फाेन बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:33 AM

कॉलिंग आणि डेटाचा खर्च फोनच्या ईएमआय पर्यायामध्येच समाविष्ट केला जाणार आहे. 

मुंबई : होळीपूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगल आणि रिलायन्स जिओने एकत्र काम करून तयार केलेला जिओ फोन नेक्स्ट आता आकर्षक खरेदी पर्यायांसह मुंबईतील सर्व मोबाईल फोन आउटलेटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिओफोन नेक्स्टची किंमत सहा हजार ४९९ रुपये असणार असून फक्त एक हजार ९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटद्वारे देखील जिओफोन नेक्स्ट खरेदी केला जाऊ शकतो. उर्वरित रक्कम १८ ते २४ महिन्यांसाठी केवळ ३०० ते ६०० रुपयांच्या ईएमआयमध्ये भरता येईल. कॉलिंग आणि डेटाचा खर्च फोनच्या ईएमआय पर्यायामध्येच समाविष्ट केला जाणार आहे. 

जिओफोन नेक्स्ट लाँच करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, इंग्रजी किंवा त्यांच्या भाषेतील सामग्री वाचता येत नाही. ते ग्राहक जिओफोन नेक्स्टद्वारे मजकूर भाषांतरित करू शकतात आणि वाचू शकतात. या स्मार्ट उपकरणावर त्यांची स्वतःची भाषा आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो की आम्ही ‘इंडिया’ आणि ‘भारत’ मधील अंतर कमी करत आहोत. कारण आता ‘भारत’ करणार डिजिटल प्रगती; प्रगती ओएस च्या साथीने. जिओफोन नेक्स्ट हा सध्या सात हजारात सर्वोत्तम पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :जिओमोबाइल