मुंबईकरांसाठी खुशखबर! जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली; मागील वर्षाच्या तुलनेत धरणात पाणीसाठा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:19 AM2023-10-03T11:19:31+5:302023-10-03T11:19:52+5:30

यंदाच्या एकूण सरासरीमुळे  पुढील जून  महिन्यापर्यंतची  मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

Good news for Mumbaikars! By June, water concerns were resolved; The water storage in the dam is more than last year | मुंबईकरांसाठी खुशखबर! जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली; मागील वर्षाच्या तुलनेत धरणात पाणीसाठा जास्त

मुंबईकरांसाठी खुशखबर! जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली; मागील वर्षाच्या तुलनेत धरणात पाणीसाठा जास्त

googlenewsNext

मुंबई : तब्ब्ल चार महिन्यांचा वेळ घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने अखेर मागील वर्षाच्या पाणी साठ्याची पातळी ओलांडली आहे. मात्र २०२१ साली झालेल्या पाणीसाठ्याची सरासरी काही गाठता आलेली नाही. तरीही यंदाच्या एकूण सरासरीमुळे  पुढील जून  महिन्यापर्यंतची  मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

यावर्षी जून आणि जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर पाऊस परागंदा झाला. सप्टेंबर महिना उजाडला तरी  पाऊस  रुसून बसला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी  कपातीची टांगती तलवार होती. पावसाचा रागरंग पाहून  पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत पालिका प्रशासन आले होते. परंतु पाऊस पुन्हा दमदारपणे बरसू लागल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागला. मात्र संपूर्ण महिना रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात पावसाची पावले रेंगाळल्यामुळे पाणी  साठ्यात रोज किंचित  का होईना, वाढ होत होती.

अजूनही अधूनमधून पावसाच्या सरी बरसतच  आहेत.  पुन्हा एकदा विशेष  करून कोकण विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत पावसाने माघार घेण्यास सुरुवात केल्याचे हवामान विभागाने जाहीर केली आहे. 

येत्या काही दिवसात पाऊस मुंबईतला मुक्काम हलवेल. यंदा पावसाने  संपूर्ण चार महिने तळ ठोकला होता. पावसाच्या या प्रदीर्घ मुक्कामामुळे धरण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला.

धरण क्षेत्रातील पावसाची नोंद

  मोडक सागर, तुळशी, विहार आणि तानसा हे तलाव पूर्ण भरले आहेत.

२०२३- १४ लाख ३५ हजार ४५८ दशलक्ष लीटर

२०२२- १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लीटर

Web Title: Good news for Mumbaikars! By June, water concerns were resolved; The water storage in the dam is more than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.